बाप माणूस! रक्ताचे नाते नसतानाही स्वीकारले १५ अंध मुलांचे पितृत्व, वाचा सविस्तर

वाशिम तालुक्यात केकतउमरा या छोट्याशा गावात पांडुरंग उचितकर राहतात. पांडुरंग हे गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. मात्र त्यांचे काम हे कौतुकास्पद आहे. त्यांनी मनाशी ठाम निश्चिय करुन काही अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मुलाची समस्या पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यानंतर त्यांच्या झोपडीत १५ अंध मूल जमा झाली. कोणतेही रक्ताचे नाते नसले तरी चक्क १५ अंध मुलांचे पितृत्व त्यांनी स्विकारले आहे. या मुलांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

पांडुरंग यांना स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही त्या १५ अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी ते न डगमगता पार पाडत आहेत. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागले.

असे असताना मात्र आज हीच १५ मूल अंध असताना पांडुरंग यांचे आधार झाले आहेत. या मुलांनी मिळून एक ऑर्केस्ट्रा काढला आहे. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. यामुळे त्यांना पैसे देखील मिळतात.

तसेच रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकतात. लॉकडाऊन काळात त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले. पण अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. आणि ती देखील वेळ निघून गेली. यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करून त्यांना मदत करतात.

पांडुरंग यांनी जन्मताच अंध असलेल्या मुलाच्या जीवनात प्रकाश टाकून त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण केली आहे. १५ अंध मुलांचे पालन- पोषणसह संपूर्ण शिक्षणाची जबाबादारी ते पार पाडत आहेत. त्यापैकी दोन अंध जोडप्याचा विवाह देखील त्यांनी लावून दिला आहे. यामुळे ते सर्व जबाबदारी पार पाडतात.

ताज्या बातम्या

११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे

अविनाश भोसले यांना ईडीचा दणका! ४० कोटींची मालमत्ता केली जप्त

त्याने माझ्यासोबत बळजबरीने सेक्स केला, मी प्रेग्नंट राहता राहता वाचले,’तारक मेहता’ मधील अभिनेत्रीने केला खुलासा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.