धक्कादायक! कोरोना रुग्णाला फक्त २५ किलोमीटर नेण्यासाठी रुग्णवाहिका चालाकाने घेतले ४२ हजार

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात रोज साडे तीन लाखांच्यावर रुग्ण भेटत आहे. या संकटात अनेकांचा जीव संकटात असताना काही लोक मात्र लोकांच्या मजबूरीचा फायदा उचलताना दिसत आहे.

आता अशीच एक धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे. नोएडामध्ये एका रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याचा फायदा एका रुग्णवाहिका चालकाने घेतला आहे. त्याने फक्त २५ किमोमीटर जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी ४२ हजार रुपये घेतले आहे.

कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहे. एकेकडी लोकांचा जीव जात आहे, तर अशा संकटात लोकांचा जीव वाचवण्याऐवजी लोकांना काही लोक रुग्णांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये घडली आहे.

२५ किलोमीटर जाण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने ४२ हजार रुपये घेतले आहे. ही रक्कम त्याला मिळाली, पण त्यानंतर ही माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि जितके पैसे रुग्णवाहिका घेते तितके घेऊन बाकीचे पैसे परत केले आहे.

दिल्ली हायकोर्टाचे अधिवक्ता असित यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यावेळी त्यांचा छोटा भाऊ विष्णु त्यांची काळजी घेण्यासाठी आला होता. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यामुळे विष्णु यांनी एक खाजगी रुग्णवाहिका चालकाला फोन लावला.

त्या रुग्णवाहिकेच्या मदतीने त्या रुग्णाला नोएडाच्या शारदा रुग्णालयात घेऊन गेले, पण तिथे बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर प्रकाश रुग्णालयात घेऊन गेले पण तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर नोएडाच्या वेस्ट स्थित यथार्थ रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

अशा प्रकारे काही २५ किलोमीटर नेण्याचे रुग्णवाहिका चालकाने ४४ हजार रुपये मागितले. पण इतके जास्त पैसे नसल्याचे विष्णुने म्हटले. त्यानंतर विष्णुने ४० हजार रुपये पेटीएमने दिले आहे आणि २ हजार रुपये कॅश दिले. त्यानंतर ही सर्व माहिती जेव्हा नोएडा पोलिसांना कळाली, तेव्हा त्यांनी त्या रुग्णवाहिका चालकाला पकडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला ऐश्वर्यासोबत एक रात्र घालवायची होती पण…
इरफान खानला झाला होता मृत्यूचा पुर्वाआभास; मुलाने केला खुलासा
बॅण्ड पथकात लावणी म्हणणाऱ्या चिमुकलीने सोशल मिडियावर घातला धुमाकूळ; पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.