‘महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहतात आणि नंतर सांगतात बलात्का.र झाला’

मुंबई : परळीच्या पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केली, या आत्महत्येसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे. त्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हंटले आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन… व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला.’

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, “इस्लामी कायदा आहे. एखाद्या महिलेचं जर लग्न झालं नसेल, तर पतीसोबत जे कृत्य करता येतं, ते ती कुठल्याही परपुरुषासोबत करु शकत नाही. कुठल्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे.

मात्र आज आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा फायदा उचलून लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत. त्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे. एखाद्या महिलेने तक्रार केली, तर पुरुष जिवंतपणी मेलाच. मात्र सत्य काय आहे ते चौकशीअंतीच बाहेर येतं,’ असेही आझमी यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अडचणीत; बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीचा आत्मह.त्येचा इशारा
“सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड”
शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत; अजित पवारांनी स्पष्ट शब्दात खडसावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.