पंजाबमध्ये काँग्रेस किंवा भाजप नाही तर ‘या’ पक्षाची सत्ता येणार, पोलमधून मोठी माहिती समोर

काही दिवसांमध्येच पंजाब राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने पंजाबमध्ये काँग्रेस(Congress), भाजप(BJP), आम आदमी पार्टी आणि इतर पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. पण या निवडणुकांआधी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाची पाळेमुळे उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(ABP C VOTER poll in punjab election)

एबीपी सीव्होटरने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये सत्ता गमावताना दिसत आहे. तर भाजप पक्षाला पंजाबमध्ये(Punjab) काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. एबीपी सीव्होटरच्या सर्व्हेनुसार, काँग्रेस आणि भाजप पक्षाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पक्षाने भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टी या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला भाजप आणि आम आदमी पार्टी या दोन्ही राजकीय पक्षांशी लढा द्यावा लागणार आहे.

एबीपी सीव्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार, काँग्रेस पक्षाला पंजाबमध्ये ११७ जागांपैकी २४ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला ५५ ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप पक्षाला फक्त ३ ते ११ जागा मिळणार आहेत, असा अंदाज एबीपी सीव्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीत अकाली दल महायुतीला २० ते २६ जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. अपक्षांना या निवडणुकीत ० ते २ जागा मिळण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ५९ जागांची गरज आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सर्वात जास्त मते मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीला सर्वात जास्त ४० टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . त्यानंतर काँग्रेस पक्षाला ३० टक्के व अकाली दल युतीला २० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप पक्षाला सर्वात कमी ८ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
40 हजारांच्या व्याजापोटी वसूल केले 8 लाख; सावकाराने वृद्ध महिलेला अक्षरश भीक मागायला लावली
ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही
ठाकरे सरकारला संजय राऊतांचा घरचा आहेर; म्हणाले, ‘मी बोलण्याचा ठेका घेतला नाहीय…’