“खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप केला आहे.

या आरोपानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरला आहे. या प्रकरणाचे पडसाद लोकसभेतही उमटले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीतील खासदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. अशातच अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही आक्रमक होत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंना पोलिस दलात घेण्यासाठी नकार दिला होता. मात्र शिवसेनेने वाझेंसाठी दबाव आणला होता. महाराष्ट्रातील कायदा सुवस्था बिघडलेली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करा”. अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.

 

“नवनीत राणा आपल्याला नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवटीच्या गप्पा करा. कारण आज खासदार म्हणून लोकसभेत जी भूमिका मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळाली आहे म्हणून मांडता आली आहे”. असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
गृहमंत्र्यांबाबत परमवीर सिंह यांनी केलेला दावा खोटा? हाती आली महत्त्वाची कागदपत्रे
पबवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसाला परमबीरसिंगांनी सस्पेंड केलं; अन् 2 कोटींची मागणी केली
परमबीरसिंगाचे पत्र ही भाजपची स्क्रिप्ट? परमबीरसिंगाचे भाजपशी असलेले संबंध झाले उघड
क्वारंटाईन असताना पत्रकार परीषद कशी घेतली? ह्या भाजपच्या प्रश्नावर देशमुखांनी केला ‘हा’ खुलासा

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.