स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली आहे. या मालिकेमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांच्या मोठी पसंती मिळत आहे. नुकतंच या मालिकेमध्ये तिन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले आल्याचे पाहायला मिळाले आहे. येत्या रविवारी या मालिकेचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (abji and pashya dance jejuri )
या विशेष भागात मालिकेतील सर्व मोरे(More) कुटुंब जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्याचे दाखवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंबियांवर खूप संकटे आली होती. या संकटांचा मोरे कुटुंबियांनी मोठ्या धैर्याने सामना केल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. आता नवीन सुरवात करण्यासाठी मोरे कुटूंबीय खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला गेले आहे.
अंजी आणि पश्या यांचं प्रेम पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. जेजुरीमध्ये संबळच्या ठेक्यावर अंजी आणि पश्या नाचताना पाहायला मिळणार आहेत. यावेळी अंजी आणि पश्या खूप आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहेत. मोरे कुटुंबियांच्या जेजुरी दर्शनाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या मालिकेचा BTS व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंजी आणि पश्या नृत्याची तयारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अंजी आणि पश्या एकमेकांकडे पाहत नाचताना दिसत आहेत. यावेळी पश्या-अंजी आणि अवनी- वैभव लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला आल्याचे दाखवण्यात आले आहे.
यावेळी पश्या अंजीला घेऊन आणि वैभव अवनीला घेऊन जेजुरी गड चढताना मालिकेच्या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षक ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेचा विशेष भाग पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर हा भाग पाहायला मिळणार आहे.
या विशेष भागात मोरे कुटूंबीय जेजुरीच्या खंडोबाला प्रार्थना करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंबियांवर खूप संकटे आल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. ज्योतीने मोरे कुटुंबियांच्या विरोधात कटकारस्थाने केली होती. पण मोरे कुटूंबियांनी तिला चांगलाच धडा शिकवलं होता, असे मालिकेत दाखवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :-
रोहित किंवा राहुलच्या जागी संघात जागा पाहिजे का? इशान किशनचे उत्तर ऐकून सगळेच झाले थक्क
हार्दिक पांड्याने घेतला भावाच्या ‘अपमानाचा’ बदला दिनेश कार्तिककडून? 3 वर्ष जुनी घटना झाली ताजी
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात