..त्यामुळे रोज रात्री मी ऐश्वर्याची माफी मागून झोपायचो, अभिषेक बच्चनने केला मोठा खुलासा

‘ऐश्वर्या आणि अभिषेक’ बॉलीवूडच्या अशा जोडप्यांपैकी एक आहेत जे त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगल्या रीतीने जगत आहेत. त्यांचे लग्नही बॉलीवूडमध्ये एक उदाहरण म्हणून मांडले जाते. २००७ मध्ये अॅश आणि अभिषेक लग्नाच्या बेडीत अडकले होते. काही काळानंतर अॅशने आराध्याला जन्म दिला.

लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघंही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल उघडपणे बोलले आहे. दोघांनीही आपले अनुभव खुलेपणाने शेअर केले आहेत. एका मुलाखतीत दोघांनी सांगितले होते की, लग्नानंतर दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे.

अभिषेकने सांगितले की, भांडण संपवण्यासाठी तो नेहमीच ऐश्वर्याची माफी मागतो. ऐश्वर्या राय बच्चननेही तिच्या मुलाखतीत असाच खुलासा केला आहे. लग्नानंतर त्यांच्यात भांडण झाले का? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारला असता, ऐश्वर्याने सांगितले की, आमची रोज भांडणे व्हायची.

ऐश्वर्याने सांगितले की, हे भांडण नव्हते तर एक प्रकारचे मतभेद होते. ती पुढे म्हणते की, जर हे भांडण झाले नसते तर आमचे लग्न खूप कंटाळवाणे झाले असते. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन म्हणतो की, सर्वच भांडणांमध्ये महिला ऐकत नाहीत. तो सांगतो कि, आम्ही एक नियम केला होता, भांडणाच्या वेळी आम्ही झोपणार नाही.

अभिषेक पुढे म्हणतो की बहुतेक भांडणांमध्ये आम्ही मध्येच एकमेकांची माफी मागितली कारण आम्हाला झोप यायची. ते शेवटी म्हणतात की स्त्रिया नेहमीच बरोबर असतात आणि आपण हे जितक्या लवकर स्वीकारू तितके आपल्यासाठी चांगले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.