Abhishek Bachchan Broke Silence On Divorce: बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक असलेल्या अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या अनेक अफवा पसरत आहेत. या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगताना दिसत होत्या. सोशल मीडियावर याबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच, आता खुद्द अभिषेकनं या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
अखेर ‘त्या’ चर्चांवर बोललाच
ई टाइम्स (E Times) ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चननं आपल्या नवीन चित्रपट ‘कालिधर लापता’ संदर्भात बोलताना घटस्फोटाच्या अफवांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणतो, “सुरुवातीला मी अशा अफवांकडे दुर्लक्ष करायचो, पण आता या अफवांचा त्रास होतोय. जेव्हा तुम्ही सतत काहीतरी नाकारत राहता, तेव्हा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे अशा गोष्टी केवळ माझ्यावर नाही, तर माझ्या कुटुंबावरही परिणाम करतात.”
“तुम्हाला माहिती नसताना, माझ्याबद्दल लिहिणं कितपत योग्य?”
अभिषेक म्हणतो, “तुम्ही मला ओळखत नाही, माझ्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नसताना, एका संगणकासमोर बसून काहीही लिहिणं हा मोठा अन्याय आहे. तुम्हाला कळत नाही, पण अशा अफवांनी एखाद्याच्या मानसिकतेवर खोल परिणाम होतो. अशा अफवांमुळे केवळ मीच नव्हे, तर माझं संपूर्ण कुटुंबच त्रस्त होतं.”
१७ वर्षांचा सोबतचा प्रवास
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न २००७ मध्ये पार पडलं. लग्नाआधी त्यांनी काही चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. ‘गुरु’, ‘धूम २’, ‘कुछ ना कहो’, ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटांमधून त्यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २०११ मध्ये त्यांना आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही कन्या झाली. लग्नाला आज १७ वर्षे झाली असून, बॉलिवूडमध्ये ही जोडी आजही ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखली जाते.
अभिषेक आणि ऐश्वर्या हे अफवांवर थेट प्रतिक्रिया देत नव्हते, पण अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात, कार्यक्रमांमध्ये एकत्र सहभागी होऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे या चर्चांना खोटं ठरवलं होतं. मात्र अफवांचा जोर एवढा वाढला की, अखेर अभिषेकला यावर बोलावं लागलं.
अभिषेकचा थेट सवाल
मुलाखतीच्या शेवटी अभिषेक म्हणतो, “आज माझ्याबद्दल जे अफवांचं वातावरण आहे, ते जर तुमच्या आयुष्यात असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं?” या एका प्रश्नातून त्यानं सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांना आरसा दाखवला आहे.