अभिनव आणि श्वेताच्या भांडणावर तिच्या पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हटला असे काही की

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी दरवेळी कोणत्या न कोणत्या कारणाने प्रसिद्धीत राहत असते. श्वेता खतरों के खिलाडी मध्ये सहभाग घेण्यासाठी केपटाऊन दक्षिण आफ्रिकेला पोझोचली आहे.

ती तेथील फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वीच तिचे आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यात वाद झाले होते. ते वाद मुलगा रेयांश वरून झाल्याचे समजते आहे.

अभिनवणे श्वेतावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर सोशल माध्यमात पण त्यावर बऱ्याच चर्चा घडून आल्या. आता श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याने पण यावर त्याचे मत व्यक्त केले आहे. नुकतेच राजाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली त्यात त्याने अनेक खुलासे केले आहेत.

राजा चौधरीने मुलाखतीत म्हटले आहे की, ‘हो, श्वेता एक उत्कृष्ट आई आणि एक चांगली पत्नी आहे यात शंका नाही. हा केवळ एक योगायोग असून तिचे दुर्दैव आहे की तिचे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले. याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे किंवा ती वाईट व्यक्ती आहे.’

राजाने पुढे म्हटले आहे की, श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यायला हवी. श्वेताला हे पण समजायला हवे की आयुष्यात कितीही जरी व्यक्तिगत समस्या आल्या तरी एक वडील आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नुकसान होईल असे कधीही वागत नाही.

श्वेताचे पहिले लग्न राजाशी झाले होते. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. राजा आणि श्वेताला एक मुलगी पण आहे. तिचे नाव पलक असून राजा तिला १३ वर्षानंतर भेटला होता. तेव्हा त्याने तिच्यासोबतचे फोटो सोशल माध्यमावर टाकले होते.

ताज्या बातम्या
आईच्या पार्थिवास अग्नी देण्यास इंजिनिअर मुलाने दिला नकार; शेवटी जे झाले ते ऐकून धक्का बसेल

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण

मी माझ्या वडिलांचा आदर करतो, पण त्यांनी दुसरे लग्न करुन योग्य केले असे मी म्हणणार नाही, कारण…- अर्जून कपुर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.