मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल 

मुंबई | बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ‘२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?’ असा प्रश्न विचारला होता. तसेच या प्रश्नामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणी अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात भाजप आमदाराने लेखी तक्रार दाखल केली आहे. अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.

पवार यांनी लातूर दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, ‘केबीसी कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला होता. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी यापैकी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?यासाठी स्पर्धकाला चार पर्याय दिले होते. १. विष्णु पुराण २. भगवद्गीता ३.ऋग्वेद ४. मनुस्मृति, हे चार पर्याय हिंदू धर्माशी संबंधित धर्मग्रंथांचे होते.

याचबरोबर जर त्यांचा हेतू बरोबर असेल तर त्यांनी चार पर्यायांमध्ये भिन्न धार्मिक ग्रंथांची नावे दिली असती. परंतु त्या पर्यायांत फक्त हिंदू धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करण्यात आला होता. असे करून अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीने हिंदू आणि बौद्ध यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसंच अत्यंत सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क यांच्या विरोधात तक्रार नोंदवली”.

 

महत्त्वाच्या बातम्या 

सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान का नाही? रवी शास्त्री म्हणाले…

एकेकाळी भारताची शान असणाऱ्या मायक्रोमॅक्सने पुन्हा घेतली दमदार एन्ट्री; दोन स्मार्टफोन लॉन्च

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.