Abhijit Sawant : बाळासाहेबांच्या आठवनीत अभिजीत सांवत भावूक; म्हणाला, माझ्या यशात बाळासाहेबांचा मोठा हात, त्यांच्यामुळेच आज मी…

Abhijit Sawant  : सोनी चैनलवरील खूपच लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ या शोच्या सगळ्यात पहिल्या पर्वात गायक अभिजीत सावंत हा जिंकला होता. हा शो जिंकल्यानंतर त्याच आयुष्य रातोरात बदल होते. त्याला स्पर्धा जिंकल्यानंतर अनेक गाण्यांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. त्याच्या आयुष्यात हा क्षण कायमचा कोरला गेला आहे. तो नेहमीच या क्षणांना उजाळा देत असतो.

दरम्यान, त्याने एका वृत्ताला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. त्याने या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल किस्सा सांगताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या त्याचाही उल्लेख केला आहे.

यावेळी त्याला त्याच्या करिअरबद्दल आणि अनेक वेगळ्या गोष्टींवरही प्रश्न विचारण्यात आले आणि त्या प्रश्नांची तो जबरदस्त उत्तर देत होता, त्यावेळी त्याने सिनेसृष्टीतील काही गोष्टींवरही भाष्य केले. मुलाखतीदरम्यान त्याला मराठी संस्कृतीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, मी मराठी असल्याचा मला खूप फायदा झाला. मराठी संस्कृती याचाही मला फायदा झाला. कारण मराठी कलाकारांना कधीच जास्त प्रसिद्धी दिली जात नाही. त्यांना जास्त उडू दिलं जात नाही. त्या सगळ्याचं हे ठिक आहे, असंच म्हटलं जातं.

त्यांनतर त्याने बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. त्यांची आठवण काढताच तो खूप भावूक झाला. त्याने सांगितले की, “माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सर्वात जास्त पाठिंबा दिला. त्यांनीच माझी सुरुवात ही करुन दिली. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं.

इंडियन आयडल जिंकल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी मला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन केले. माझ्या यशामागे त्यांचा मोठा हात आहे. यापुढचा प्रवास आपला कसा असायला हवा, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे मराठी संस्कृती आणि मराठी माणूस एकमेकांना ज्याप्रकारे मदत करतो त्याचा मला फार मोठा फायदा झाला”.

तो पुढे म्हणाला, मला कार्यक्रम संपल्यानंतर अनेक वाईट अनुभव आले. शो मोठा असल्याने लोकांनी स्वतःचं स्वतःची मतं बनवली होती. जेव्हा शो सुरु होता तेव्हा आमच्यासोबत एक पीआर एजंट होता. त्यावेळी आमच्याबद्दल चांगले लेख, बातम्या छापल्या जायच्या. पण जसं शो संपला आणि मी खऱ्या जगात आलो तेव्हा मात्र मीडिया आणि लोक फार बदलले होते.

महत्वाच्या बातम्या
याला म्हणतात शिवरायांचा कट्टर मावळा! महाराजांचा वारसा जपण्यासाठी बांधलं किल्ल्यासारखं घर
रावसाहेब दानवेंनी केला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘भाजपाची शेण खाण्याची परंपरा सुरूच..
India : शेवटच्या श्वासापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेश विजयी; अक्षरश भारताच्या तोंडातून हिरावला विजयाचा घास