महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिहून अटकेचे चॅलेंज देणाऱ्याला चोप चोप चोपले

सोशल मीडियावर प्रत्येकजण आपआपले मत मांडत असते, पण काही सोशल मीडियावर युजर्स पातळी सोडत एकाद्या विषयावर, पक्षावर किंवा व्यक्तीवर भाष्य करताना दिसतात. आक्षेपार्ह लिखाणामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर कारवाईही केली जाते.

आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. लखोबा लोखंडे फेसबूक पेजवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तरुण आक्षेपार्ह लिखाण करत होता. आता त्या तरुणाला सायबर क्राईम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाच्या तोंडावल काळे फासले आहे. हा तरुण फेसबुकच्या माध्यमातून सतत महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करत होता.

संबंधित तरुणाचे नाव अभिजित लिमये असे आहे. अभिजित हा सांगलीचा रहिवासी आहे, पण तो बेंगलोरला नोकरी करतो. त्याने फेसबूकवरुन महाविकास आघाडीला मला पकडून दाखवल्यास १०० कोटी देईल, असे चॅलेंज केले होते.

अभिजित ठाकरे परीवार आणि शिवसेना नेते यांच्यावर बदनामीकारक पोस्ट तो सतत फेसबूकवर अपलोड करत होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईमधील माहिम पोलिसांनी शनिवारी त्याला पुण्यात आणले आहे.

अभिजित हा सतत ठाकरे कुटुंबाबद्दल आणि शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह लिखाण करत होते. तो लखोबा लोखंडे या अकाऊंटवरुन हे लिखाण करत होता. त्यामुळे आदित्य चव्हाण यांनी लखोबा लोखंडेची ७ खोटी अकाऊंट हॅक केली होती. त्यानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शेवटचा श्वास घेताना सुद्धा ते म्हणत होते, माझ्या संभाजीराजांचा फोटो मला दाखवा; वाचा काळजाचं पाणी करणारा किस्सा
“सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि सरकार स्थापन केले”
अटक करा, नजरकैदेत ठेवा, काहीही करा; मी ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारच

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.