सध्या देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विरोधी पक्ष नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत. राष्ट्रपती(President) पदाच्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले आहेत. भाजपकडून देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. (abhijit bichukale part in president election)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोपालकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. गोपालकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. तर फारुख अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आहेत. भाजपकडून अद्याप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.
यादरम्यान आणखी एक उमेदवार राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील अभिजित बिचुकले यांनी राष्ट्रपती पदाची निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान अभिजित बिचुकले यांनी ही माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार-खासदारांसोबत चर्चा करत असल्याचे देखील अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे.
अभिजित बिचुकले मुलाखतीत म्हणाले की, “मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी-खासदारांशी सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे. मी बहुजन समाजातील आहे. मी अतिशय निर्व्यसनी आणि सुशिक्षित आहे. मला कायद्याची माहिती आहे, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. पण त्यावेळी त्यांनी कुणीतरी कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचं राष्ट्रपतीपद दिलं. त्यांना बहुमतामुळे ते जमलं”, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले.
अभिजित बिचुकले मुलाखतीत पुढे म्हणाले की, “आता मी एक डावपेच आखत आहे. आपल्या न्यायपालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, त्या सिस्टम राष्ट्रपतीच्या दबावाखाली असतात. राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या असतात. पण त्या करत नाहीत. म्हणून मी देशातील आमदार खासदार यांच्यासोबत बोलतोय.”
“सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरु आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार. अर्ज जोवर भरत नाही तोवर मला गुपित ठेवायचं होतं”, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले. राष्ट्रपती होणं आणि पंतप्रधान होणं ह्या गोष्टी करून दाखवयाच्या आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे”, असे देखील अभिजित बिचुकले यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
चला हवा येऊ द्या नंतर आता भारत गणेशपुरे, सागर कारंडे ‘या’ हिंदी शोमध्येही झळकणार, चाहते उत्सुक
रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे..! मुलाला धमकी आल्यावर वसंत मोरे खवळले