तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

मुंबई | नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे मेहुल पै सोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी अभिज्ञा भावे आणि मेहुल पैने गुलाबी रंगाचे आउटफिट घातलेले दिसत आहे. अभिज्ञाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहे.

तर आता अभिज्ञाने तिच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने खास कॅप्शन देखील दिले आहे. अभिज्ञाने म्हणतीये, ‘६ जाने २०२१. मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसातील काही आनंदाचे, भावनिक आणि खास विशेष क्षण शेअर करत आहेत.’

अभिज्ञाच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच अभिज्ञाचा हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ९० हजार चाहत्यांनी पाहिला आहे.

दरम्यान, अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या
देशात ‘टिकैत फॉर्मूला’ लागू करा; शेतकरी नेत्याच्या ‘या’ मागणीने मोदी सरकारला फुटला घाम..
“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल
‘आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.