शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केल्याने संतप्त माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा राजीनामा; मोदींवर गंभीर आरोप

मुंबई | गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. त्यामध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

अशातच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र असणारे अभयसिंह चौताला यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आमदारकीचा त्याग करत असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, त्यांनी याआधीच हरियाणा विधानसभेच्या सभापतींना पत्र पाठवून आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मोदी सरकारने २६ जानेवारीपर्यंत कृषी कायदे मागे घेतले नाहीत,तर माझ्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावे. त्या कायद्यांना संपूर्ण देशातील शेतकरी विरोध करत आहेत, असे अभयसिंह यांनी त्या पत्रात म्हटले होते.

ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार…!
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकीकडे पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनातच फूट पडल्याचे चित्रं आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतली असून आंदोलनाशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन संघटनांनी अचानक आंदोलनातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय हा शेतकरी आंदोलनासाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या, दिल्लीतही तेच वातावरण तयार केलं’
दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ
शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.