Homeताज्या बातम्यारश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळणार? ‘या’ शिवसेना नेत्याच्या सुचक विधानाने चर्चांना उधान

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळणार? ‘या’ शिवसेना नेत्याच्या सुचक विधानाने चर्चांना उधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तसेच त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहू शकले नाही. यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

तसेच उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्ममंत्रिपदाची जबाबदारी रश्मी वहिणींकडे द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. याचाच धागा पकडत आता शिवसेना नेत्याने याबाबत एक विधान केले आहे.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील, असे त्या नेत्याने म्हटले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरुनही आता भाजप नेते महाविकास आघाडीवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला लवकरच अडीच वर्षे पुर्ण होणार आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, पण ऐनवेळी भाजपने ते अमान्य केल्यामुळे ही युती तुटली होती. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सरकार स्थापन केले होते.

आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खळबळजनक विधान केले आहे. रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले गेले तर कोणाचीही हरकत नसेल, असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार हे दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी महत्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. यावेळी त्यांनी महायुतीवरही भाष्य केले आहे. गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न त्यांना एका वृत्तवाहिनीने विचारला होता. त्यावर बोलताना, नितीन गडकरी ज्यादिवशी मन जुळवण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
नवरदेवाचा नवरीवर गेला तोल अन् नको तेच घडलं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
“विराट कोहलीचे आकडे पण रहाणे-पुजारासारखेच, त्याला संघातून का काढून टाकत नाही?”
‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली