Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची?, याचा आज निकाल लागणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. यात दोन्ही गटांकडून शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरी शिवसेना नेमकी कोणाची?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात लागणार आहे.
त्याआधीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या आधीच त्यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गटाचे ४० आमदार आणि १६ खासदार या सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख नेते, उपनेते या सर्वांनी एकमताने एकनाथ शिंदे आमचे पक्षप्रमुख राहतील, असा ठराव केला असल्याचे सत्तार यांनी सांगितले आहे.
यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सगळे निवडून आलेले लोक हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत. त्यामुळे यांना काहीच अधिकार नाही. आधी घटना मान्य करून नंतर पक्षवाढीचे काम करायचे असते. परंतु, त्यांनी घटनाच मान्य केलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सत्तासंघर्षाच्या बाबतीत सत्याचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले आहेत.
आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा प्रश्न निकाली लागणार आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली होती. या घटनापीठापुढे आज सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत आज काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shinde group : दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट अॅक्शन मोडवर; केली ही मोठी प्लॅनिंग
Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; वाईन विक्रीवरून भाजप-शिंदे गट आमने सामने, नेमकं प्रकरण काय?
Eknath shinde : शिंदे फडणवीस सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजपच्या मंत्र्याची थेट मुख्यमंत्री शिंदेंवर टीका, शिंदे गट आक्रमक
Shivsena : शिवसेना-शिंदे गट वादाला नवे वळण, पोलिसांनी सरवणकरांचे पिस्तूल जप्त करत केली मोठी कारवाई