Share

Abdul Sattar : शिंदे गटातील वाद भर बैठकीत उफाळला! सत्तारांची तुफान शिवीगाळ; शिंदेंनी घेतला काढता पाय

abdul sattar

Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि आपले सरकार स्थापन केले. तसेच जास्तीत जास्त शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी आहे, असे दावे करण्यात येत आहेत. मात्र, आता शिंदे गटातच वादाची ठिणगी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे सरकारला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली होती.

यावेळी शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी या बैठकीत शिवीगाळ केल्याची बातमी समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या पीएलाच शिवीगाळ केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यानंतर ते तिथून निघून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव खतगावकर यांना अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर तिथे उपस्थित काही मंत्री आणि आमदारांनी मध्यस्ती करत त्यांची समजूत काढली. परंतु, वादानंतर अब्दुल सत्तार बैठकीतून निघून गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खाजगी सचिव नाराज असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तारांच्या या वागण्यामुळे शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दोन्ही गटाकडून नावाचे पर्याय आयोगाकडे देण्यात आले आहेत. तसेच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात धावही घेतली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग
Abdul Sattar : अखेर ठरलं! हे आहेत शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट
Devendra Fadanvis : अब्दुल सत्तारांचा उतावीळपणा पाहून फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीत झापलं, म्हणाले, परस्पर..
Melghat: मी मुक्काम केलेलं घर रात्रभर गळत होतं, माझ्याकडून त्यांना दोन घरं, आजच भूमीपूजन अब्दुल सत्तारांची घोषणा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now