विराट कोहली आणि कॅमेराचे नाते एखाद्या दिलदार आशिक सारख आहे. जिथे जिथे विराट कोहली जातो तिथे तिथे मन तुटल्या आशिक सारख कॅमेरा कोहलीच्या मागेच राहतो. विराट कोहली कितीही कॅमेरा पासून वाचण्याचा प्रयत्न करत असला तरी कॅमेरा त्याचा पिछा नाही सोडत. वीराट कोहली आणि कॅमेऱ्याच्या जुगलबंदीचा एक व्हिडिओ सोशल मिडिया वर खूप चर्चेत आहे.(Guard, Virat Kohli, Camera, Video, Indian Premier League, Viral, Royal Challengers)
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या एलिमिनेटरसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ सज्ज आहे. बुधवारी संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. एलिमिनेटरपूर्वी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कोणत्या ना कोणत्या रूपात येताना दिसला.
अखेरच्या लीग सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. सामन्यापूर्वीच कोहली व्हायरल होत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये कोहली सराव करण्यापूर्वी गार्ड परिधान करत आहे. यादरम्यान कोणीतरी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे.
https://twitter.com/highon_beer/status/1529076296197632000?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529076296197632000%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fwatch-video-virat-kohli-asked-fan-not-to-shoot-while-he-was-wearing-his-guard-1023481
यावर माजी कर्णधार त्या व्यक्तीला सांगत आहे की, तो गार्ड घालत आहे आणि त्याला शूट करू नको. मात्र, त्यानंतर ती व्यक्ती शूटिंग करत राहते. तो त्याच्या हालचाली थांबवत नाही. यानंतर विराट कोहली स्वतः दुसरीकडे वळतो. विराट कोहलीच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याला या मोसमात अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.
गेल्या मोसमानंतर कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. दबाव कमी झाल्यानंतर कोहलीची बॅट रंग दाखवेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. विराट कोहलीला या मोसमात तीनवेळा खातेही उघडता आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
‘मला तुमची आठवण येते बाबा, तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये’; विलासरावांच्या आठवणीने रितेशला अश्रु अनावर
करणच्या पार्टीत प्रचंड बोल्ड अवतारात दिसली मलायका; लोक म्हणाले, कपडे घरी विसरले का? पहा फोटो
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल