विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याचा प्राथमिक कल पाहता पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.
गोरखनाथ मंदिराच्या बाहेर भाजप कार्यकर्ते जल्लोषात घोषणाबाजी करत आहेत. यावेळी त्यांनी ‘योगी को PM बनाएंगे’ ‘अब की बार योगी सरकार’ अशीही घोषणाबाजी केली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनाही चांगलेच सुनावले आहे. परंतु जनता जिंकत असून गुंडगिरीचा पराभव होत असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान ३७ वर्षानंतर योगी आदित्यनाथ यांना मिळणार आहे. राज्यात १९८५ नंतर जनतेने कोणत्याच पक्षाला दुसऱ्या वेळी सत्ता दिलेली दिसत नाही. १९८५ मध्ये काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
त्यानंतर मात्र आजवर कोणाला ही सत्ता टीकवून ठेवता आली नाही. जर योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले भाजपच्या हाती मोठे यश येणार आहेत. मुख्य म्हणजे यावर्षी सुध्दा योगी आदित्यनाथ यांच्या हाती सत्ता आली तर ते सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे पाचवे मुख्यमंत्री ठरतील.
दरम्यान उत्तर प्रदेशात भाजप 266 जागांनी आघाडीवर आहे. तर सपा त्यामानाने खूप मागे आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. या संख्यबळापर्यंत भाजप पोहचले आहे. त्यामुळे भाजपचे घवघवीत यश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंजाब, उत्तरल प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यात विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सकाळ पासून सुरु झाली आहे. यामध्ये आता पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का देत आप बहुमताच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. पंजाबमध्येही आप येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपने ही जल्लोष साजरी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
“भाजपला पराभूत करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे”
उत्तरप्रदेश निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला का? निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ उत्तर
चार राज्यातील भाजपच्या विजयाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘…हा काँग्रेसला धक्का’
ज्येष्ठ साहित्यिक एम. जी. भगत आढळले रस्त्यावर भीक मागताना, चौकशी केल्यावर झाला धक्कादायक खुलासा