एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला ठोकला कायमचा रामराम, चाहत्यांना दिला ‘हा’ मोलाचा संदेश

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. एबीने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण आता तो आयपीएलसारख्या लीगमध्येही भाग घेणार नाही. डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग आहे.

एबी डिव्हिलियर्सने ट्विट केले की, ‘हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या घरामागील अंगणात माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला लागल्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि निर्भयपणे खेळलो आहे.

आता वयाच्या ३७ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यात तेवढा उत्साह राहिला नाही. डिव्हिलियर्सने लिहिले की, क्रिकेटने माझ्यावर खुप दया केली आहे. टायटन्स असो वा प्रोटीज किंवा आरसीबी, या खेळाने मला अकल्पनीय अनुभव आणि संधी दिल्या आहेत. यासाठी मी सदैव ऋणी राहीन.

मी संघातील सहकारी, विरोधक, प्रशिक्षक, फिजिओ आणि प्रत्येक सपोर्ट सदस्याचे आभार मानू इच्छितो ज्यांनी एकाच मार्गावर प्रवास केला. डिव्हिलियर्सने पुढे लिहिले की, दक्षिण आफ्रिकेत, भारतात आणि मी जिथे जिथे मी खेळलो तिथे मला मिळालेला पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे.

शेवटी मला माहित आहे की माझे कुटुंब, माझे आई-वडील, माझा भाऊ, माझी पत्नी डॅनियल आणि माझ्या मुलांचा त्याग केल्याशिवाय काहीही शक्य झाले नसते. मी माझ्या आयुष्याच्या पुढील अध्यायाची वाट पाहत आहे जेव्हा मी त्यांना खरोखर प्रथम स्थानावर ठेवू शकेन.

३७ वर्षीय एबी डिव्हिलियर्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीने 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या ज्यात तीन शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL-14 च्या पहिल्या टप्प्यात डिव्हिलियर्सची खेळी जबरदस्त होती.

यादरम्यान डिव्हिलियर्सने सात सामन्यांत 51.75 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 207 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या टप्प्यात त्याला खास कामगिरी करता आली नाही. आरसीबी व्यतिरिक्त, एबीने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता.

सध्याच्या काळातील महान फलंदाजांमध्ये डिव्हिलियर्सची गणना केली जाते. तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही राहिला आहे. त्याने आपल्या देशासाठी 114 कसोटी सामन्यांच्या 91 डावांमध्ये 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या ज्यात 22 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २७८ आहे.

एबी डिव्हिलियर्सने 228 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 53.50 च्या सरासरीने 9,577 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 25 शतके आणि 53 अर्धशतके आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १७६ आहे. टी-20 मध्ये डिव्हिलियर्सने आपल्या देशासाठी 78 सामन्यात 1672 धावा केल्या.

यादरम्यान त्याची सरासरी २६.१२ राहिली आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 10 अर्धशतके आहेत आणि नाबाद 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आता त्याने सगळ्याच फॉर्मेटमधून सन्यास घेतल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. भारतात एबीचे खुप चाहते आहेत. आरसीबीमुळे एबीला भारतात एक वेगळी ओळख मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या
मी तोंडफाटका माणूस आहे, मला ओठ शिवता येत नाही, त्या मतावर आजही ठाम- विक्रम गोखले
‘अखंडा’चा शानदार ट्रेलर रिलीज; भारतरत्नवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नंदामुरींनी जिंकली चाहत्यांची मने
एवढ्याश्या लहान वयात तैमुर करतोय पैसे लुटण्याच्या बाता; स्वतः सैफअली खाननेच केलं उघड..
मोदींना ‘या’ गोष्टीची भीती, म्हणून त्यांनी कृषी कायदे मागे घेतले; मलिकांनी सांगितले खरे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.