जेव्हा मुंबईत झाल्या एबी डिव्हिलीयर्सच्या नावाच्या घोषणा, रोहित-विराटही झाले होते हैराण, पहा व्हिडीओ

‘एबी डिव्हिलियर्स’ने दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या, पण भारतात सामने खेळताना त्याला मिळालेले प्रेम आणि आदर हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न आहे. आता भारतीय चाहत्यांना त्याचा आवडता ‘मिस्टर ३६० डिग्री’ मैदानावर खेळताना पाहता येणार नाही.

एकदा वानखेडे स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात एबी डिव्हिलियर्सचा नारा लागला यावरून डिव्हिलियर्सच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे त्यावेळी स्थानिक क्रिकेटर रोहित शर्मा मैदानावर फलंदाजीसाठी उतरला होता. आता एबीच्या निवृत्तीनंतर या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये विराट कोहली सहकारी खेळाडू एबीला सांगत आहे, रोहित जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा प्रेक्षकांनी एबी-एबीच्या घोषणा दिल्या. रोहित मुंबईचा आहे आणि तो वळून मागे असलेल्या लोकांना म्हणाला, ‘अरे हे काय?’ व्हिडिओमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्स जोरदार हसत आहेत.

विशेष म्हणजे एबी डिव्हिलियर्सने शुक्रवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे, एबीने २०१८ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. एबी डिव्हिलियर्सने ट्विट केले की, ‘हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मी माझ्या अंगणात माझ्या मोठ्या भावांसोबत  क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने खेळलो आहे. आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती ज्योत तितक्या वेगाने जळत नाही. ३७ वर्षीय एबीने १८४ आयपीएल सामन्यांमध्ये ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे.

मात्र, तो आयपीएल विजेतेपदापासून वंचित राहिला. IPL-14 च्या पहिल्या टप्प्यात डिव्हिलियर्सच्या बॅटने जोरदार कामगिरी केली होती. यादरम्यान डिव्हिलियर्सने सात सामन्यांत ५१.७५ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण २०७ धावा केल्या. एबीने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्वही केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) या लोकप्रिय आयपीएल संघाने आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. संघाला तीनदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आले. २०११ मध्ये कोहलीला पहिल्यांदा संघाचे कर्णधारपद मिळाले.

संघात मोठी नावे असूनही, हा संघ २०१७ आणि २०१९ च्या सीजनमध्ये शेवटी राहिला. त्यानंतर २०२० आणि २०२१ च्या सीजनमध्ये या संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, परंतु ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश आले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.