कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे आयुर्वेदीक औषध ठरतंय रामबाण उपाय; आयुष मंत्रालयाचा दावा

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत वाढत चालली आहे. पण रुग्णांना वेळेत उपचार भेटत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे.

अशा परिस्थितीत आता कोरोनाचे लक्षण असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक आयुर्वेदिक औषध रामबाण उपाय असल्याचे दिसून आले आहे. आयुर्वेदीक औषध आयुष ६४ कोरोनाचे लक्ष दिसून आलेल्या लोकांच्या उपचारासाठी फायद्याचे ठरत आहे.

आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे औषध फायद्याचे ठरत आहे. इतकेच नाही, तर एसिम्टोमॅटीक रुग्णांवरही हे औषध फायद्याचे ठरत असल्याचे दिसून आले आहे.

आयुष मंत्रालयाने सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्युट आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या निरिक्षणाखाली देशातल्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या १४० रुग्णांवर या औषधाने उपचार केले आहे.

आता या निरिक्षणात असे समोर आले आहे की, हे औषध घेतल्यानंतर कोरोना रुग्ण खुप लवकर बरे होत आहे. इतकेच नाही तर त्यांची कोरोना टेस्ट केली असता काही दिवसांतच ते कोरोना निगेटिव्ह आल्याचे दिसून आले आहे.

तसेच तज्ज्ञांनुसार, आयुष ६४ या औषधाला एलोपॅथिक औषधांसोबत पण घेता येऊ शकतात. या औषधाच्या फक्त दोन गोळ्यांना दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत घेतल्या जातात. आयुर्वेदीक डॉक्टरांनी २ ते १२ आठवड्यांपर्यंत ही गोळ्या खाण्याचा सल्ला दिला आहे.

असा दावा केला जात आहे, की हे औषध कोरोना रुग्णांना मानसिक आणि शारीरीक स्थितींना ठिक करत आहे. हे औषध डायबेटीज असलेल्या रुग्णांवरही प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू आणि चिन्याचा डान्स होतोय वायरल; पहा व्हिडिओ
बापरे! टेलिव्हिजनवरील सीता म्हणजेच दिपीका चिखलियाने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम
प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.