मेंहदी है रचनेवाली! स्वप्नालीच्या हातावर लागली आस्तादच्या नावाची मेंहदी; बघा मेंहदी सोहळ्याचे फोटो

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीनसराई सुरु झाली आहे. अनेक अभिनेत्यांची लगीनघाई सुरु आहे. मानसी नाईक, मिताली मयेकर, सई लोकूर असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आत्ता या यादीत अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीलच्या नावाचा समावेश झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या केळवणाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. स्वप्नालीच्या आणि आस्तादच्या लग्नाच्या शॉपिंगचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

आज स्वप्नाली आणि आस्तादचा मेंहदी सोहळा पार पडला. दोघेही व्हॅलेंनटाईन दिवशी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरवला आहे. दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमातील अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

दोघे गेले अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. आस्तादने बिग बॉसच्या पहील्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात त्याने पहील्यांदा त्याने त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती. त्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती. आत्ता हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.