‘आशिकी’ गर्ल अनू अग्रवाल अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाली

सासों की जरुरत हो जेसे,
जिंदगी के लिए,
बस्स एक सनम चाहीए
आशिकी केल लिए…

हे शब्द कानावर आल्यानंतर सर्वात पहीले आपल्याला अनू अग्रवालचा चेहरा नकळत आठवतो.

२३ जुलै १९९० साली आशिकी हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘आशिकी’ चित्रपटाला तीस वर्ष पुर्ण झाले आहेत. पण तरीही या चित्रपटाची जादू मात्र कमी होत नाही.

त्या काळातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहीला आहे. आजही हा चित्रपट त्यांच्या सर्वात जास्त आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

आशिकी चित्रपट सुपरहिट झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील अभिनेता राहूल रॉय आणि अभिनेत्री अनू अग्रवाल रातोरात स्टार झाले होते.

रातोरार या दोघांचे स्टारडम खुप जास्त वाढले होते.पण त्यानंतर मात्र हे दोघेही वन फिल्म स्टार ठरले. कारण ‘आशिकी’ चित्रपटानंतर या दोघांचे सगळे चित्रपट फ्लॉप झाले.

या चित्रपटाची अभिनेत्री अनू अग्रवाल सुपरस्टार झाली होती. पण नंतर तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर ती अचानक या फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली होती.

चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती घटनी घडली होती. त्यामूळे रातोरात स्टार झालेली अनू अग्रवाल एका रात्रीतून फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली होती.

‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले. एका अपघाताने तिचे अख्खे आयुष्य बदलले.

आशिकीनंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामूळे ती करिअर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिवशी अनू बॉलीवूडच्या एका पार्टीत गेली होती.

त्या रात्री पार्टीतून घरी परत येत असताना अनूच्या गाडीला खुप मोठा अपघात झाला. त्या अपघातात ती खुप जखमी झाली होती. त्यामूळे लोकांनी तिला ओळखलेच नाही.

तिथल्या नागरिकांनी पोलीसांना अपघाताची माहीती दिली आणि अनूला हॉस्पिटलमध्ये घेवून गेले. अपघातानंतर अनु जवळपास २९ दिवस कोमात गेली.

इतकेच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली होती. सुदैवाने ती कोमातून बाहेर आली. पण तोपर्यंत आयुष्य बदलले होते. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना.

पुढे स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनू बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.

बॉलीवूडमध्ये तोपर्यंत अनेक नवीन अभिनेत्री आल्या होत्या. त्यामूळे फिल्म इंडस्ट्री अनू अग्रवालला विसरून गेली. तिने परत चित्रपटांमध्ये येण्याचा प्रयत्न केला. पण तिला यश मिळाले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.