‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉयवर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिदा

‘आशिकी’ फेम अभिनेता राहूल रॉय सध्या ब्रेन स्ट्रोकमूळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ब्रेन स्ट्रोकमूळे राहुलला बोलता येत नाही. कारगिलमध्ये चित्रपटाची शुटिंग करत असताना. त्याची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांनी सांगितले आहे की, राहूलला पुर्णपणे नीट होण्यासाठी वेळ लागेल.

या कालावधीत राहूल रॉयबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. राहुलचे अनेक जुने किस्से चर्चेत आले आहेत. राहूलने १९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

या चित्रपटामूळे राहूलला बॉलीवूडमध्ये लव्हर बॉय म्हणून ओळख निर्माण झाली होती. सामान्य मुलींसोबतच अनेक बॉलीवूड अभिनेत्री राहूल रॉयच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. राहूल अनेक वेळा त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या अफेअरमूळे चर्चेत असायचा.

राहूल रॉयचे नाव सर्वात पहिले दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी पुजा भट्टसोबत जोडले गेले होते. या दोघांनी जानम, जुनून आणि फिर तेरी कहाणी याद आयी अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटांच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती.

हे दोघे एकत्र टाईम स्पेन्ड करत होते. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जायचे. पण हे दोघेही त्यावेळी आपापल्या करिअरमध्ये खुप जास्त व्यस्त होते. म्हणून या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. या कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

राहूल रॉयचे करिअर खुप वाईट सुरू होते. या कालावधीमध्ये राहूलच्या आयुष्यात मनिषा कोईरालाची एन्ट्री झाली. दोघांनी अचानक आणि मझधार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. चित्रपटाच्या शुटिंग वेळी मनिषा राहूलच्या प्रेमात पडली होती.

राहूल रॉय मात्र त्यावेळी त्याच्या करिअरवर लक्ष देत होता. म्हणून या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. राहूलने आपल्या करिअरला महत्त्व दिले आणि मनिषासोबत ब्रेकअप केले. दोघांनी आपल्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर राहूल रॉय अभिनेत्री सुमन रंगनाथनसोबत देखील रिलेशनशिपमध्ये होता. एका पार्टीत दोघांची भेट झाली होती. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले होते. सुमन त्यावेळी बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत होती. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली होती.

दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक दोघेही वेगळे झाले. असे बोलले जाते की, दोघांनी त्यांच्या करिअरवर लक्ष देण्यासाठी हे नातं तोडले होते. या ब्रेकअपमूळे राहूल रॉय खुप दुखी होते. या कालावधीत त्यांची मुलाखत राजलक्ष्मी खानविलकरसोबत झाली.

दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना दोन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी २००० मध्ये लग्न केले. पण या दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर राहुल रॉय एकटेच आयुष्य जगत होते.

२०१६ मध्ये त्यांच्या आयुष्यात सुपर मॉडेल साधना सिंगची एन्ट्री झाली. राहूल रॉय परत एकदा प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आज या दोघांचे रिलेशनशिप खुप चांगले सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

फक्त दहा चित्रपटांमध्ये रश्मीका मंदाना कशी झाली साऊथची टॉपची अभिनेत्री

जाणून घ्या ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतील सुमन नक्की कोण आहे?

अमिताभ बच्चनने केली त्यांच्या २८०० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा

‘शोले’ चित्रपटातील जेलर सायकलच्या दुकानात करत होते काम; एका नाटकाने बदलले आयुष्य

तुमची लाडकी प्राजक्ता माळी ‘या’ मुलासोबत करणार लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.