Share

”तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?”

rahul-gandhi-sad.

आसामचे(Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(Himnat Biswa Sarma) यांनी उत्तराखंडमधील(Utrrakhand) एका प्रचारसभेत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या प्रचारसभेत हिमंता बिस्वा सरमा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींवर टीका केली आहे. या विधानामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(aasam cm himnat biswa sarma statement on congress rahul gandhi)

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सध्या उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यावर आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांनी एका प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. २०१६ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

याबाबत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ” बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पुरावे मागितले. असे ते का वागतात कळत नाही. लष्करच्या कारवाईचे तुम्हाला पुरावे का लागतात?”, असा सवाल हिमंता बिस्वा सरमा यांनी राहूल गांधींना केला आहे.

उत्तराखंडमधील प्रचारसभेला संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “पाकिस्तानवर बॉम्ब फोडला असे लष्कराने सांगितले तर त्यावर विश्वास ठेवा. त्यावर शंका घेऊन वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. तो वादाचा मुद्दा होऊ शकत नाही”, असे नमूद करत हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर टीका केली.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला आहे का? त्यामुळे भारतीय सैनिकांचा अपमान करू नका. बिपीन रावत यांचा असा अपमान करू नका”, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत. देशाचे पहिले सरंक्षण दल प्रमुख दिवंगत बिपीन रावत सेवेत असताना काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती.

या टीकेचा हिमंता बिस्वा सरमा यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, जनरल रावत यांना काँग्रेसने ‘सडक का गुंडा’ म्हंटले होते आणि आता तेच लोक त्यांच्या नावाने उत्तराखंडमध्ये मत मागत आहेत. किती हा ढोंगीपणा?”, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरही त्यांनी मत व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या :-
पोलिस मामाच झाले चोर! ठाण्यातील डिझेल चोरताना पोलिसाला रंगेहाथ पकडले, असा आखला होता प्लॅन
अशिक्षित मेस्त्रीने काही मिनिटांत अडीच टनांचे शिवलिंग पिंडीवर बसवले, भलेभले अधिकारी इंजिनिअर झाले होते फेल
VIDEO: लग्नाच्या वाढदिवशी पत्नीचे पाय दाबताना दिसला संजूबाबा, नेटकरी म्हणाले, प्रत्येकाला पत्नीचे..

राजकारण

Join WhatsApp

Join Now