आजकाल कुठे गायब आहे गोविंदाची ‘आंखे’ चित्रपटातील अभिनेत्री?

नव्वदच्या दशकात प्रसिद्ध असणारे अनेक कलाकार आज फिल्मी दुनियेपासून दुर गेले आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्यात कुटूंबासोबत खुप आनंदी आहेत. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव आहे शिल्पा शिरोडकर.

नव्वदच्या दशकातील खुप प्रसिद्ध अभिनेत्री होती शिल्पा शिरोडकर. तिने आंखे, खुदा गव्वाह, गोपी किशन, मृत्यूदंडसारख्या ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये रिलीज झालेल्या गजगामीनी चित्रपटानंतर त्यांनी फिल्मी पडद्यापासून मोठा ब्रेक घेतला.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये शिल्पाने गोविंदा, अक्षय कुमार, मिथून चक्रवर्तीसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. जास्त करुन शिल्पाने मिथून चक्रवर्तीसोबत चित्रपट केले. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेली शिल्पाने बॉलीवूडमध्ये चांगले यश मिळवले होते.

वयाच्या सोळाव्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेल्या शिल्पाला निर्माते अशूभ मानायचे. कारण तिने कोणताही चित्रपट साईन केल्यानंतर एक तर तो चित्रपट फ्लॉप व्हायचा किंवा बंद पडायचा. त्यामूळे कित्येक चित्रपटांतून तिला काढून टाकण्यात आले.

१९९० मध्ये रिलीज झालेल्या ‘किशन कन्हैया’ चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. यामागचे कारण शिल्पाचा अभिनय किंवा डान्स नाही तर तिचा धबधब्याखाली केलेला डान्स होता. या चित्रपटात शिल्पाने मंदाकिनीप्रमाणे पांढऱ्या साडीमध्ये पाण्याखाली डान्स केला होता. ज्यामूळे ती प्रसिद्ध झाली.

या चित्रपटानंतर शिल्पाला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण ती इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनवू शकली नाही. त्याकाळी बॉलीवूडमध्ये माधूरी, काजोल, जुही चावला आणि करिश्मा कपूरचे राज्य होते. या अभिनेत्रींमध्ये शिल्पा स्वत वेगळी ओळख बनवू शकली नाही.

२००० मध्ये शिल्पाने एका विदेशी व्यवसायिकासोबत लग्न केले आणि लंडनला स्थायित झाली. शिल्पाप्रमाणेच तिची छोटी बहीण नम्रता शिरोडकर देखील इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनवू शकली नाही. खुप कमी वेळातच दोन्ही बहीणींचे करिअर संपले होते.

अनेक वर्ष बॉलीवूडपासून दुर राहिल्यानंतर २०१३ मध्ये शिल्पाने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले. पण यावेळेस तिने चित्रपट नाही तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून अभिनयात कमबॅक केले होते. एक मुठी आसमान, सिलसिला प्यार का मालिकांमध्ये काम केले.

पण टेलिव्हिजनवर देखील तिला जास्त यश मिळाले नाही. शिल्पा सध्या तिच्या कुटूंबासोबत दुबईमध्ये राहत आहे. बॉलीवूडच्या इंतर काही अभिनेत्रींप्रमाणेच शिल्पा देखील तिच्या काही मोजक्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.

महत्वाच्या बातम्या –

कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो

सलमान भाऊ, तू माझ्या आईला वाचवलेस; भर रस्त्यात ढसाढसा रडत राखीने मानले सलमानचे आभार

अमृताची आई बेगम रुकसानामूळे अमृता आणि विनोद खन्नाचे झाले होते ब्रेकअप?

सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.