आमजद खानच्या मुलाने राणी मुखर्जीसोबत बॉलीवूडमध्ये केला होता डेब्यू; पण मिळाले नाही यश

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये जोपर्यंल हिरोला परेशान करणारा खलनायक नसतो. तोपर्यंत चित्रपट पाहायला मज्जा येत नाही. हिंदी चित्रपट हिरो आणि खलनायक या दोन्ही गोष्टींमूळे ओळखले जातात. कोणताही चित्रपट त्यांच्याशिवाय पुर्ण होत नाही.

बॉलीवूडमध्ये असे अनेक खलनायक आहेत ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण आज ते फिल्मी दुनियेपासून दुर राहत आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड खलनायकांच्या मुलांची भेट करुन देणार आहोत.

१ अमरिश पुरी – बॉलीवूडमधील काही खतरनाक खलनायकांमध्ये अमरिश पुरीचे नाव सर्वात पहीले येते. कारण त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त खलनायकाच्या भुमिका केल्या आहेत. त्यांच्या भुमिका आजही लोकांना आवडतात. पण त्यांचा मुलगा मात्र अभिनयापासून दुर राहून बिजनेस करतो. मात्र त्यांचा नातू वर्धन पुरी मात्र बॉलीवूडमध्ये लॉन्च झाला आहे.

२ मॅक मोहन – शोले, तोहफा सारख्या चित्रपटांमध्ये खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मॅक मोहनला लोकं आजही विसरु शकले नाहीत. त्यांची प्रत्येक भुमिका त्यांच्या चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा विक्रांत देखील अभिनेता आहे. पण त्याला इंडस्ट्रीमध्ये खास ओळख मिळवता आली नाही.

३ एम.बी. शेट्टी – एम.बी.शेट्टी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. त्यांना खलनायकाच्या भुमिका केल्या. त्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्टंट मॅन म्हणून देखील काम केले. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा रोहित शेट्टी आज बॉलीवूडमधला मोठा दिग्दर्शक आणि निर्माता आहे.

४ गुलशन ग्रोव्हर – गुलशन ग्रोव्हर त्यांच्या भुमिकांमूळे नेहमीच प्रेक्षकांशी चर्चेचा विषय बनतात. त्यांनी कधी अभिनेत्री तर कधी अभिनेत्याच्या बहीणीला त्रास देऊन अनेक भुमिका गाजवल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा संजय ग्रोव्हरला मात्र अभिनयात बिलकूल रुची नाही. तो बिजनेस मॅन आहे आणि त्या क्षेत्रात त्याने चांगले नाव कमवले आहे.

५ कबीर बेदी – खुन भरी मांग चित्रपटामध्ये खलनायकाची भुमिका साकारुन कबीर बेदीने सर्वांची मने जिंकून घेतली होती. त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात हॅंडसम खलनायकांपैकी एक समजले जाते. त्यांची मुलगी पुजा बेदी अभिनेत्री आहे. पण दुसऱ्या लग्नापासून झालेला मुलगा आदम बेदी अभिनेता नाही. तो लंडनमधला प्रसिद्ध मॉडेल आहे.

६ आमजद खान – शोले चित्रपटातील गब्बरच्या भुमिकेतून घराघरात पोहोचलेले आमजद खान सर्वांनाच माहीती आहेत. त्यांची प्रत्येक एक भुमिका अजरामर आहे. वडीलांप्रमाणेच त्यांचा मुलगा शादाब खानने अभिनेता बनण्याची स्वप्न पाहीली होती.

त्याने राणी मुखर्जीसोबत ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण त्यानंतर मात्र तो इंडस्ट्रीतून गायब झाला. त्याला वडीलांप्रमाणे यश मिळाले नाही. आज तो अभिनयापासून दुर आयूष्य जगत आहे. त्याने ‘स्कॅम’ वेबसीरीजमधून इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला यश मिळाले नाही.

७ शक्ति कपूर – शक्ति कपूर इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या खलनायकांपैकी आणि कॉमेडियन पैकी एक आहेत. त्यांचा अभिनय आजही लोकांना आवडतो. त्यांचा मुलगा सिद्धांतने हसीना पारकर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. तर त्यांची मुलगी श्रद्धा इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

महत्वाच्या बातम्या –
सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भाऊ कदम यांची लाडकी लेक करणार मनोरंजन सृष्टीत प्रवेश?
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..
शाहरुखचा मुलगा अब्रामची आई गौरी खान नाहीये, तर कोण आहे माहितीये का?
नर्गिसच्या आठवणींमध्ये वेडे झाले होते राज कपूर; दिवस रात्र प्यायचे दारु

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.