‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन

रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाने भारतीय फिल्म इंडस्ट्रीला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले आहे. १९७५ मध्ये रिलीज झालेला शोले आजही तेवढाच नवीन वाटतो. कितीही वेळा बघितले तरी लोकांना चित्रपट बोर होत नाही. २०२१ मध्ये देखील लोकं हा चित्रपट आवडीने पाहतात.

जय-विरु, ठाकूर, बसंती, धन्नोसोबतच चित्रपटातील खलनायक गब्बरही चांगलाच हिट झाला होता. आजपर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक खलनायक आले आणि गेले पण गब्बरची जागा कोणीही घेऊ शकल नाही. आजही आमजद खानने निभावलेली गब्बरची भुमिका अजरामर आहे.

त्याकाळात गब्बरची भुमिका निभावण्यासाठी अनेक अभिनेते पुढे आले होते. पण ही भुमिका मात्र आमजद खानला मिळाली. आज आम्ही तुम्हाला याच भुमिकेबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया असे काय घडले ज्यामूळे ही भुमिका आमजद खानला मिळाली होती.

रमेश सिप्पीने चित्रपटाची स्क्रिप्ट पुर्ण केल्यानंतर प्रत्येक एक पात्रासाठी एका खास अभिनेत्याची निवड केली होती. गब्बरच्या भुमिकेसाठी रमेश सिप्पीच्या डोक्यात सर्वात पहीले नाव अभिनेता डॅनीचे आले होते. त्यांना डॅनी या भुमिकेसाठी सर्वात उत्तम वाटले होते.

त्यावेळी डॅनी फिरोज खानच्या धर्मात्मा चित्रपटाची शुटींग करत होते. फिरोज खानने डॅनीला दुसरा कोणताही चित्रपट करायला नकार दिला होता. डॅनीने एक भुमिका गमावली होती. म्हणून त्यांना दुख झाले होते. पण त्यावेळी काहीही करु शकत नव्हते.

डॅनीनंतर रमेश सिप्पीने गब्बरच्या भुमिकेसाठी शत्रूघ्न सिन्हाला निवडले होते. शत्रूघ्न त्यावेळी खलनायकांच्या भुमिकेतून बाहेर येऊन हिरोच्या भुमिका साकारत होते. त्यांना परत एकदा खलनायक बनायचे नव्हते. म्हणून त्यांनी भुमिकेला नकार दिला.

शत्रूघ्ननंतर संजीव कुमारने ही भुमिका निभवायचे ठरवले. पण रमेश सिप्पीला ही गोष्ट मान्य नव्हती. कारण संजीव कुमार त्यावेळी हिरोच्या भुमिकेसाठी संजीव कुमार खुप प्रसिद्ध होते. त्यांनी खलनायक बनणे रमेश सिप्पीला मान्य नव्हते. त्यामूळे त्यांना ठाकूर बनावे लागले.

धर्मेंद्रने ही भुमिका साकारण्याची इच्छा जाहिर केली होती. पण त्यांची ही इच्छा पुर्ण होऊ शकली नाही. एक दिवस रमेश सिप्पी त्यांच्या ऑफिसमध्ये शोले चित्रपटाची तयारी करत होती. त्यावेळी एक युवक गब्बरच्या भुमिकेत त्यांच्या समोर येऊन थांबला.

त्यांनी सिप्पीला आपली ओळख आमजद खान नावाने करुन दिली. आमजद खानचा हा अंदाज रमेश सिप्पीला खुप आवडला. त्यांनी लगेच त्यांना गब्बरच्या भुमिकेसाठी फायनल केले. खास गोष्ट म्हणजे चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने स्वत डिझाइन केला होता.

चित्रपटाच्या रिलीजनंतर गब्बरची भुमिका अजरामर झाली. आजही लोकं या भुमिकेची आठवण काढत असतात. आमजद खानने खऱ्या अर्थाने या भुमिकेला जिवंत केले होते. त्यामूळे आजही ही भुमिका लोकांच्या मनात कायम जिवंत आहे.

महत्वाच्या बातम्या –
तुझे करिअर संपवल्याशिवाय शांत बसणार नाही! अभिनेत्याची सलमान खानला धमकी
रोहित शेट्टी बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर झाले होते फिदा; पत्नीला सोडण्याची केली होती तयारी
यामीने तिच्या लग्नात नेसली होती चक्क ३३ वर्ष जूनी साडी; जाणून घ्या काय आहे साडीचं सिक्रेट
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.