Share

या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) चा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. निर्मात्यांनी खास अंदाजात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यादरम्यान हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. जगात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला. (Aamir Khan’s ‘Lal Singh Chadda’ to break KGF 2 record?)

या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत साऊथ सुपरस्टार यशच्या KGF 2 चित्रपटाला मागे टाकू शकतो, असे सांगितले जात आहे.

यासाठी आम्ही तुम्हाला अशी पाच कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे लाल सिंह चड्ढा हा चित्रपट KGF 2 चित्रपटाला मागे टाकू शकतो. यातील पहिले कारण म्हणजे बॉलीवूड अभिनेता आमिर खान बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नव्हती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला होता.

दुसरे कारण म्हणजे अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर यांची हिट जोडी या चित्रपटात दिसणार आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटानंतर अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटातील आमिर खान आणि करीना कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

आता पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूर यांची हिट जोडी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आमिर खान आणि करीना कपूर यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तिसरे कारण म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख विशेष आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी खास तारीख निवडली आहे.

हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. १३ तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे आणि १५ तारखेला स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या सुट्टीचा लाभ चित्रपटाला मिळणार आहे. चौथे कारण म्हणजे हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट आहे. हा हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे.

त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, अशी निर्मात्यांना आशा आहे. पाचवे कारण म्हणजे या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या देखील भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शाहरुख खान आणि सलमान खान या चित्रपटात असल्यास त्याचा फायदा चित्रपटाला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
गुजरात जिंकल्यानंतर सोशल मिडीयावर मोदी आणि अमित शहांचे ‘ते’ फोटो व्हायरल, फिक्सिंग केल्याचा होतोय आरोप
भाजपने कोल्हापूरात उमेदवार उतरवल्यानंतर राऊत संतापले, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी…
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मैदानात, ‘या’ बड्या नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी, चर्चांना उधाण

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now