Share

लालसिंग चड्ढाच्या धक्क्यामुळे आमिरने बदलला मार्ग, आता केले असे काही की कुणी विचारही केला नव्हता

Aamir Khan

अनेक बॉलिवूड स्टार्सनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. मात्र आमिर खान या सर्व गोष्टींपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहे. आपण म्हणण्यापेक्षा करून दाखवतो ही म्हण त्याने दाखवली आहे. त्याने साऊथचा चित्रपट साईन केल्याचे वृत्त आहे.

KGF 1 आणि KGF 2 सारखे चित्रपट दिग्दर्शित करणार्‍या प्रशांत नीलचा हा पुढचा चित्रपट आहे. चित्रपटाचे वर्किंग टायटल एनटीआर ३१ ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. गॉसिप कॉरिडॉरमधील अफवांवर विश्वास ठेवला तर आमिर खान या चित्रपटातून दक्षिणेतील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.

चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी आमिर खानला अप्रोच करण्यात आल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट आमिर खानला सांगितली आणि त्यांना ती खूप आवडली. या चित्रपटासाठी आमिर खानने दिग्दर्शक प्रशांत नील यांना होकार दिला आहे.

मात्र आमिर खान खरोखरच या चित्रपटात आहे की नाही याबाबत अद्याप चित्रपट निर्मात्यांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. पण असे झाले तर प्रेक्षकांना आमिर खान आणि एनटीआर सारखे दोन वेगवेगळ्या पट्ट्यातील दोन स्टार्स एकत्र पाहण्याची संधी मिळेल.

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान यांना एकत्र पाहण्याची प्रेक्षकांकडून बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. आमिर खानने त्याच्या गजनी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ज्युनियर एनटीआरची भेट घेतली तेव्हापासून ही मागणी होती. आरआरआरच्या प्रमोशनमध्ये आमिर खानही सहभागी झाला होता.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर खान आणि ज्युनियर एनटीआरने नाटू नाटू या गाण्यावर स्टेप बाय स्टेप डान्स केला. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तेव्हापासून प्रेक्षकांची इच्छा होती की, दोघेही चित्रपटात एकत्र आले तर मजा काही वेगळीच असेल. प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या खऱ्या ठरल्या तर प्रेक्षकांचे स्वप्न साकार होईल.

महत्वाच्या बातम्या
बर्थडे पार्टीचे बिल मागितल्याने संतापला शिंदेगटातील आमदारपुत्र; थेट हातपाय तोडण्याची धमकी दिली
अपघातानंतर रक्ताने माखलेला पंत संतापला; व्हिडीओ काढणाऱ्यांकडे पाहून दिली ‘अशी’ संतप्त प्रतिक्रीया
ऋषभ पंतच्या अपघातानंतर दिनेश कार्तिकने सर्वांना केली ‘ही’ कळकळीची विनंती; म्हणाला, प्लिज आतातरी..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now