आमिर खानने घेतला धक्कादायक निर्णय; कायमचा रामराम ठोकत म्हणाला..

मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानने कालच त्याचा वाढदिवस साजरा केला. आता त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे.

आमिरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे की, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे.

तसाही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचे ठरवले आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आपण पूर्वी ज्याप्रकारे संवाद साधत होतो, त्याप्रमाणे पुढे देखील मी तुमच्या संपर्कात असणार आहे, असे त्याने म्हंटले आहे.

दरम्यान, आमीर खानचे लाखो चाहते जगभर पसरले आहेत. म्हणून आमीरचे ट्विटरवर फॉलोअर्स आहे तब्बल २६.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ही संख्या आहे ३.६ मिलियन्स. इन्स्टाग्रामवर त्याने १४७ पोस्ट्स केल्या आहेत. तर ट्विटरवर आमीर केवळ ९ लोकांना फॉलो करतो.

महत्त्वाच्या बातम्या 

शाहरुख खानची पत्नी बनायला ऐश्वर्याने दिला होता नकार; म्हणाली, हा तर…

जळगावात राजकीय भूकंप! भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेत; भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार?

झोपडीत राहणाऱ्या मुलाचा डान्स पाहून माधुरीही झाली होती फिदा; झळकला डान्स दिवानेमध्ये, व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.