आमीर खान बाॅलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये का जात नाही? स्वत:च सांगीतले हे धक्कादायक कारण

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला खुप जास्त मेहनत करावी लागते. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. यश मिळवायचे असेल तर मग तुम्हाला सर्व प्रकारची मेहनत करायची तयारी हवी असते.

बॉलीवूडमध्ये पण असचं आहे तुम्हाला यश हवे असेल तर मग तुम्हाला मेहनत करावी लागते. तुम्ही जर बॉलीवूडमध्ये नवीन असाल तर मग तुम्हाला डबल काम करावे लागते. त्याशिवाय यश बघायला भेटत नाही.

तुम्हाला बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. करिअरच्या सुरुवातीला तर प्रत्येक गोष्टीत अडचण येत असते. तेव्हा तुम्हाला हार न मानता त्या अडचणींचा सामना करावा लागतो. पण अनेक वेळा त्या गोष्टी करताना तुम्ही पूर्णपणे हारून जाता.

असाच काही किस्सा अभिनेता आमिर खानचा आहे. आमिर खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यावेळी आमिर खानला रडायला आले होते. पण त्याने हार मानली नाही.

आमिर खानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला आमिर खानला अडचण झाली होती. पण त्याने हार मानली नाही.

आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटामूळे तो रातोरात सुपरस्टार झाला होता. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्याने देखील चित्रपटांना होकार द्यायला सुरुवात केली.

आमिर खानने एकसाथ आठ चित्रपट साइन केले होते. तो चित्रपटांची तयारी करत होता. या काळात अनेकांनी आमिर खानला वन फिल्म स्टार म्हटले होते. त्यामूळे त्याला खुप त्रास होत होता.

बॉलीवूडमधल्या अनेक लोकांनी आमिर खानला सांगितले की, ‘तुझे करिअर संपले आहे. तु यापुढे जेवढे चित्रपट करशील ते सगळे फ्लॉप होतील. त्यामूळे तु चित्रपट साइन करू नकोस. तुझे स्टारडम फक्त एका रात्रीचे होते’.

ह्या गोष्टी ऐकल्यानंतर आमिर खानला रडायला यायचे. तो दिवसभर काम करायचा आणि रात्री घरी आल्यानंतर एकटा रडत बसायचा. त्याला खुप जास्त टेन्शन यायचे. पण तो कधीही काहीही बोलला नाही. त्याने आपल्या कामावर लक्ष दिले.

आमिर खान मन लावून काम करत होता. शेवटी त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याचे चित्रपट यशस्वी होऊ लागले. त्याला अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर त्याने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली.

आमिर खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘मी बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी खुप जास्त मेहनत केली आहे. अनेक अडचणींचा सामना केला आहे. मी अपयशी झालो तेव्हा अनेकांनी मला नावे ठेवली. पण यश मिळाले तेव्हा कोणीही माझे कौतुक करण्यासाठी आले नाही’.

बॉलीवूडमध्ये तुम्हाला नाव ठेवणारे अनेक जण असतात. पण तुमच्या कामाचे कौतुक करणारे कोणी नसते. म्हणून मी बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये जास्त सहभागी होत नाही. माझी काम करतो आणि माझ्या कुटुंबासोबत राहतो’. असे देखील तो म्हणाला.

आमिर खानला करिअर सुरुवातीला अनेकांनी नावे ठेवली होती. आज मात्र तो बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. तो वर्षाला एक चित्रपट करतो. पण पुढच्या दहा वर्षांचे पैसे कमावतो.

महत्त्वाच्या बातम्या –

गर्लफ्रेंडसाठी खूप काही केले, चूक नसताना माफी मागीतली; तरीही अजून एकटाच आहे..

अक्षयकुमारने साखरपुड्यानंतर वाऱ्यावर सोडले होते रविनाला; स्वत: रविनानेच सांगीतली आपबिती

..म्हणून त्या दिवशी करिष्माने शाहीद कपूरला सेटवरून हाकलून दिले होते; जाणून घ्या कारण..

भरातलं करीअर सोडून विनोद खन्ना ओशो आश्रमात का गेले होते? अखेर मुलगा अक्षयने केला खुलासा

सुशांत केसची सीबीआयची चौकशी पुर्ण हायकोर्टात अहवाल देणार; जाणून घ्या काय निष्कर्ष निघाला..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.