पहिली पत्नी रीना दत्ताचे पत्र वाचून अमीर खानला झाले अश्रू अनावर

बॉलिवूड अभिनेता आमिर खान च्या निर्मितीत तयार झालेला पहिला चित्रपट म्हणजे ‘लगान’. आज ‘लगान’ चित्रपटाला तब्बल २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटामुळे आमिर खानला एक परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळाली होती. आमिरच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाला खूप यश मिळाले होते.

या चित्रपटासाठी आशुतोष आणि आमीर यांना ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ साठी ऑस्कर नामांकनही मिळाले. हा चित्रपट ऑस्कर जिंकू शकला नसला, तरी इतर सर्व पुरस्कार या चित्रपटाने जिंकले होते. ‘लगान’ हा तोच चित्रपट होता, ज्याच्या शूटिंगदरम्यान आमीर पत्नी किरण राव हिच्या जवळ आला होता.

या सिनेमा दरम्यानच आमिर खान आणि किरण राव एकमेकांजवळ आले. या सिनेमाला किरणने असिस्ट केले आहे. आमिर खानच्या म्हणण्यानुसार, या सिनेमाशी संबंधित अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत. मात्र आमिर खानकरता सर्वात खास क्षण होता जेव्हा पत्नी रीनाचे पत्र आले होते.

आमिर खानने दिलेल्या माहितीनुसार, एका रात्री मी रीनाला सांगितले होते की, तू हा सिनेमा प्रोड्युस करते. तेव्हा रीनाने याला नकार दिला होता. कारण तिला याबाबत काहीच माहित नव्हते. आणि हे खरंच होते. मात्र आमिर खानकरता रीनाने प्रोडक्शनची जबाबदारी सांभळली. याकरता रिनाने खासकरून तयारी केली होती. रीना या प्रोजेक्ट करता सुभाष घईला भेटली होती.

या आठवणीबद्दल पुढे आमिरने सांगितले की, ‘तिने खूप कमी वेळात चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक गोष्टी शिकल्या, हे खूप कौस्तुकास्पद आहे. मला आठवतंय ती खूप कडक शिस्तीची निर्माती होती, सर्वांना ओरडत असे. मलाही ती ओरडत असायची. म्हणजे विचार करा, जी नवीन मुलगी आताच निर्मिताची झाली आहे, ती आशुतोषसह माझ्यापासून सर्वांना ओरडत असायची.

परंतु जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा रीनाने सर्व टीमला एक पत्र लिहिले होते आणि ते वाचून खूप रडलो. आता मला पूर्ण पत्र आठवत नाही. परंतु तिने कठीण परिस्थितीत चित्रपट तयार करण्यासाठी सर्वांचे आभार मानले होते आणि ओरडत असल्याची गोष्ट देखील तिने नमूद केली होती. ते पत्र खूप भावूक करणारे होते.

आम्ही सर्वजण चित्रपटचा बॅकग्राउंड असलेले होतो, पण तिचा चित्रपटसंबंधित कोणताही बॅकग्राउंड नसूनही तिने कमाल काम केले होते. आमिर खानच्या निर्मितीच्या या पहिला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या जवळ आले आणि आमिरने रीनाला तलाक देऊन किरण रावशी लग्न केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.