जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

फिल्म इंडस्ट्री बाहेरुन एका चंदेरी दुनियेसारखी दिसते. त्यात अनेक प्रकारचे चित्रपट रोज तयार होतात. हे सर्व चित्रपट आपल्याला अनेक गोष्टींचा ओळख करुन देतात. पण बॉलीवूडमध्ये एक काळ असाही होताज्यावेळी पुर्ण बॉलीवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचे राज्य होते.

नव्वदच्या दशकामध्ये डॉन दाऊद ईब्राहिम बॉलीवूडवर राज्य करायचा. अनेक मोठे दिग्दर्शक आणि निर्माते त्याला घाबरायचे. पण बॉलीवूडमध्ये आमिर खान हा एकमेव असा अभिनेता आहे जो कोणाच्याही धमकीला घाबरला नाही.

९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक डॉन राज्य करायचे. त्यांच्या एका फोनवर मोठे मोठे निर्माते घाबरायचे. बॉलीवूडचच्या मोठ्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना अंडरवर्ल्डमधून आलेली प्रत्येक एक मागणी पुर्ण करावी लागायची. जर मागणी पुर्ण केली नाही तर मग तुम्हाला तुमचा जीव गमवाव लागायचा.

२००० पर्यंत बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचे वर्चस्व खुप जास्त वाढले होते. त्यामुळे सर्वजण खुप परेशान झाले होते. या कालावधीमध्ये आमिर खान एका चित्रपटाची निर्मिती करत होता. या चित्रपटामध्ये तो स्वत: मुख्य भुमिकेत होता. तर दिग्दर्शक आशूतोष गोवारिकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. जम्मू सुगंध या चित्रपटाचे distribution चे काम करणार होते.

आमिर खानचा हा चित्रपट होता ‘लगान’. आमिर खान या चित्रपटामध्ये होता. त्यामुळे सगळीकडे या चित्रपटाची चर्चा होती. ‘लगान’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झाला होता. त्यामुळे अंडरवर्ल्डमधून आमिर खानला फोन येण्यास सुरुवात झाली.

अंडरवर्ल्ड डॉनने आमिर खानकडे करोडोची मागणी केली. त्यासोबतच लगाच चित्रपटाचे writes मागण्यास सुरुवात केली. आमिर खानने या गोष्टीला पुर्णपणे नकार दिला. कारण या चित्रपटासाठी आशुतोष गोवारिकरने खुप जास्त मेहनत घेतली होती.

आमिर खानचा नकार ऐकून डॉनला खुप राग आला. मग डॉनने आमिर खान, आशुतोष गोवारीकर आणि जम्मू सुगंध या तिघांना उडवण्याचा प्लॅन केला. या अगोदर देखील अनेक कलाकारांना अंडरवर्ल्डमधून धमक्या मिळाल्या होत्या. त्यामूळेच दिग्दर्शक राजीव राय भारतसोडून बाहेर देशात राहायला गेले होते.

जेव्हा त्यांनी अब्बू सलीमची गर्लफ्रेंड मोनिका बेदीला त्यांच्या चित्रपटामध्ये काम दिले. त्याचवेळी त्यांना भारतामध्ये परत येता आले आणि कामाला सुरुवात करता आली. असे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत झाले होते.

यावेळी त्यांची नजर आमिर खानवर होती. आमिर खान आणि त्याच्या पुर्ण टिम डॉनच्या शार्प शुटरचे लक्ष होते. आमिर खानला देखील ही गोष्ट समजली होती. त्यामूळे आमिरने अगोदरच या गोष्टीची कल्पना मंबई पोलीसांना दिली होती. मुंबई पोलीसांनी लवकरच डॉनच्या र्शाप शुटरला पकडले आणि जेलमध्ये टाकले.

त्यामूळे आमिर खान आणि त्याच्या पुर्ण टिमचा जीव वाचला. आमिर खानच्या अशा वागण्यामूळे अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली. पण कोणीही काहीही करू शकले नाही. त्याच्यानंतर हळूहळू बॉलीवूडमधला अंडरवर्ल्डचा दबदबा कमी झाला.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

शेवटच्या दिवसांमध्ये स्वत:च्याच घरासाठी चढावी लागली कोर्टाची पायरी; खुपच वाईट होता अभिनेत्री साधनाचा शेवट

‘द डर्टी पिक्चर’ बघितल्यानंतर विद्या बालनच्या आई वडीलांनी दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

आई झाल्यानंतर ‘तारक मेहता’मधील रिटा रिपोटरने पोस्ट केले बिकनीतील फोटो; फोटोसोबत दिला खास संदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.