‘आमचं ठरलंय’! कोल्हापुरात नव्या राजकीय पक्षाची स्थापना

 

कोल्हापूर | गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक प्रमोद पाटील यांनी कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’या नावाने पक्षाची स्थापना केली आहे.

प्रमोद पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नोंदणीसाठी कागदपत्रेही सादर केली आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्ष्याला अधिकृत मान्यता मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत धनंजय महाडिक यांना साथ न देता शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणले.

तेव्हापासून आमचं ठरलं हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. कोल्हापुरात अनेक संस्थांच्या निवडणुका पक्ष पातळीवर होत नाहीत त्यावेळी आघाडीच्यावतीने आमचं ठरले हा पक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या दिवसात गोकुळ दुध संघ आणि राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर या पक्षाची स्थापना केल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.