Share

केवळ १ रुपया मानधन; मतदारसंघात सायकलने प्रवास, आपच्या आमदाराची होतेय देशात चर्चा

mla.

पंजाबमध्ये(Punjab) आम आदमी पक्षाचे सरकार आले आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा शपथविधी सोहळा १०० एकरांच्या परिसरात झाला होता. या शपथविधी सोहळ्याची मोठी चर्चा झाली होती. पण सगळ्यात जास्त चर्चा आम आदमी पक्षाचे आमदार गुरुदेव सिंह देव मान यांची झाली होती.(aam adami party mla gurdev singh dev maan)

या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुरुदेव सिंह यांनी नाभा ते चंदीगड ९० किमीचा सायकल प्रवास केला. हा प्रवास त्यांनी स्वतः सायकल चालवत केला. शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः सायकल चालवत ९० किमी अंतर पार करणारे गुरुदेव सिंह देव मान हे देशातील पहिले आमदार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा होत आहे.

लोक त्यांचे कौतुक करत आहेत. गुरुदेव सिंह देव मान हे पंजाबमधील नाभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते आम आदमी पक्षाचे नेते आहेत. २०१७ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नाभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. पण यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत निवडणूक जिंकली.

निवडणूक जिंकल्यानंतर गुरुदेव सिंह देव मान यांनी एक घोषणा केली होती. नाभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या आपण सायकलवर फिरून समजून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते. आपण आमदार म्हणून फक्त १ रुपया मानधन घेणार, अशी घोषणा देखील त्यांनी केली होती. यामुळे पंजाबमध्ये सर्व ठिकाणी त्यांची चर्चा होत आहे.

सायकलवरून फिरत असताना आमदार गुरुदेव सिंह देव मान यांनी स्वतः रस्त्यावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. गोशाळा रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्यासाठी गुरुदेव सिंह देव मान स्वतः लाईटच्या खांबावर चढले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षांपासून ही स्ट्रीट लाईट बंद होती.

प्रशासनाला निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. नाभा मतदारसंघात फिरत असताना नागरिकांनी आम आदमी पक्षाचे आमदार गुरुदेव सिंह देव मान याबाबतची माहिती दिली. त्यावर प्रशासनाची वाट न पाहता त्यांनी स्वतः ती स्ट्रीट लाईट दुरुस्त केली. आमदार गुरुदेव सिंह देव मान शासनाची सुरक्षा आणि गाडी वापरण्यास देखील नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान
चांगली बातमी! नाशिक फाटा ते राजगुरूनगर अंतर अवघ्या २० मिनीटांत होणार पुर्ण
अनुपम खेर यांचे काश्मिरबाबतचे ‘ते’ ट्विट पुन्हा व्हायरल, म्हणाले होते, हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now