आम आदमी पार्टीचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, आमचे मुख्यमंत्री नजरकैदेत

नवी दिल्ली | शेतकर्‍यांनी आज भारत बंद पुकारला आहे. यावरून राजकारण चांगलच तापले आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

 

यापुर्वी अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकर्‍यांची भेट घेतली होती. सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना पाठींबा दिला होता. त्यानंतर केजरीवाल घरी परतले सोमवारपासून गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यांना दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. अशी माहिती सौरभ भारद्वाज यांनी ट्विट करून दिली.

 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. ते कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी देत नाहीत. तसेच केजरीवाल यांनाही घराबाहेर येण्याची परवानगी नाही. काही आमदार त्यांना भेटण्यासाठी गेले असता पोलिसांकडून त्यांना मारहाण झाली आहे. असा आरोप भारद्वाज यांनी केला. त्यांचे हे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.

 

दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. नऊ स्टेडियमवर जेल बनवू दिल नाही. म्हणून केजरीवाल यांच्या निवासस्थानाला जेल बनवले आहे. आणि हे काम देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.