भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर रविवारी एका खास कार्यक्रमाचे आजोयन करण्यात आले होते. ‘बोला जय भीम’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. या कार्यक्रमात शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायकांनी बाबासाहेबांवरील अनेक गाणी गायली. यामध्ये शिंदेशाही घराण्याची चौथी पिढी आल्हाद शिंदे (Aalhad Shinde) यानेदेखील गाणं गायलं. तर याबाबत आल्हादने सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘बोला जय भीम’ या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, त्यांची मुले आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या गायनांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर याच घराण्यातील पाचवी पिढी म्हणून आल्हाद शिंदे सध्या संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित आहे. तर आल्हाद शिंदेलाही ‘बोला जय भीम’ या कार्यक्रमात भीमगीत सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आल्हादने आपला हा अनुभव सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
आल्हादने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो शेअर केले. यासोबत त्याने लिहिले की, ‘दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांसमोर सादर झालो. खूप धमाल केली. खूप काही शिकायला मिळालं. आणि माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की, आज मला माझ्या आजोबांसमोर म्हणजेच आनंद शिंदे यांच्यासमोर माझं गाणं ‘पुस्तक भिमाचं रमाईचं’ गायचे होते’.
‘मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन, माझे काका उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे ह्यांनी मला खूप मदत केली. जरी आम्ही एक परिवार असलो, तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणि मी त्यांचा शिष्य होतो. ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. जेव्हा माझं गाणं संपलं, जी पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे पप्पांचे डोळे भरुन आले होते’.
‘मला पप्पांनी सांगितले ‘मी तुला लहानपणापासून, प्रल्हाददादा बोलायचो. आजपासुन तूच माझा प्रल्हाददादा आहेस’. हे ऐकून मला रडू आले. माझे काका आणि माझे आजोबा ह्यांनी भरभरून आशिर्वाद दिले. असंच माझ्यावर आणि शिंदेशाहीवर प्रेम करत राहा. धन्यवाद सोनी मराठी ही संधी देण्यासाठी’.
https://www.instagram.com/p/CcMeUiGKDf8/
दरम्यान, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांना आदर्श, उत्कर्ष आणि हर्षद अशी तीन मुले आहेत. यामध्ये आनंद आणि उत्कर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. तर हर्षद हा अॅनिमेशन इंजिनियर आहे. तर आल्हाद हा हर्षद यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिंदेशाही घराण्यातील पाचवी पिढी म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिले जात आहे.
आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे हे उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांच्या आजी सोनाबाई या तबलावादक होत्या. या दाम्पत्यांना सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद अशी तीन मुले होती. तर प्रल्हाद शिंदे यांनी देखील अनेक भक्तीगीत, भीमगीत आणि लोकगीतं गायली आहेत. त्यांची ही गीतं आजही लोकप्रिय आहेत. तर त्यांच्याच संगीताचा वारसा त्यांचा मुलगा आनंद शिंदे आणि नातवंड आता पुढे चालवताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
KGF फेम यश ‘या’ भारतीय खेळाडूला मानतो आपला आदर्श, म्हणाला, ‘मला त्याचं व्यक्तिमत्व खूप आवडतं’
हिंदी चित्रपट साऊथमध्ये का नाही चालत? सलमानच्या प्रश्नावर यश म्हणाला, सुरूवातीला लोकं..
…त्यावेळी ऐश्वर्याने भर सभेत काहीही विचार न करता केली होती जया बच्चन यांची मदत, लोकं म्हणाले होते..