सैराटने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस केलेला परश्या सद्या काय करतोय? पहा..

मुंबई | सैराट चित्रपटातून प्रत्येकाच्या घरात पोहचलेला आकाश ठोसर अर्थात सर्वांचा लाडका परश्या सध्या काय करत असेल? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. अशाच लाखो परश्च्याया चाहत्यांसाठी आम्ही एक गुड न्यूज घेऊन येत आहोत. सध्या परश्या काय करतोय? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

मूळचा सोलापूरचा असलेल्या आकाशने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पूर्ण केले आहे. आकाशला लहानपणापासूनच सिनेमे पाहायची प्रचंड आवड होती. मात्र आपण स्वत: कधी कोणत्या सिनेमात दिसू असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.

परंतु, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाशला सैराट चित्रपटासाठी ऑफर दिली. आणि पुढे आकाशचे आयुष्यच बदलून गेले. तसेच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आकाशने लॉकडाऊनच्या काळात ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हि कादंबरी वाचली असल्याचे सांगितले आहे.

अभिनयाबरोबरच आकाश स्वत:चे छंद देखील जोपासताना दिसतं आहे. आकाश व्यायामावरही खूप मेहनत घेत आहे. त्याने नियमित व्यायाम करून आपले शरीर पिळदार बनवले आहे. वाचन, व्यायाम या व्यतिरिक्त जर मोकळा वेळ मिळाला तर अगदी शेतातही तो काम करताना आपण पाहिलं आहे.

दरम्यान, याचबरोबर स्वतःच्या भूमिकेनुसार भाषेवर, लुक्सवर आकाशने मेहनत घेतली आहे. तसेच आकाश सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांना त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी सांगत असतो. यामुळे आकाश अगदी कमी कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
‘आपले आयुष्य उध्वस्त केले’, रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया
अमेरीकेतील लाखोंची नोकरी सोडून आली शेती करायला, आज मोठमोठ्या हाॅटेल्सला जातात उत्पादने
एकेकाळी स्वतः रोलर फिरवून खेळपट्टी तयार करण्याचे काम करायचा, आज गाजवतोय IPL

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.