Share

आकाश चोप्रा म्हणाला, टाटा बाय-बाय; संतापलेल्या पोलार्ड म्हणाला, कदाचित यामुळे तुला…

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डची आयपीएल २०२२ मधील कामगिरी खराब होती. तो चेंडू किंवा बॅटनेही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या संघावरही झाला आणि पाचवेळा चॅम्पियन संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.(West Indies, captain, Kiran Pollard, Mumbai Indians, tweet, cricket)

आपल्या खराब कामगिरीमुळे पोलार्ड अनेकवेळा माजी भारतीय फलंदाज आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राच्या निशाण्यावर आला. आकाशने अनेक वेळा पोलार्डवर उघडपणे टीका केली. आता लीग संपल्यानंतर पोलार्डनेही आकाशला टॅग करत ट्विट केले आहे, ज्यात त्याने लिहिले आहे की “आशा आहे की चाहता वर्ग आणि फॉलोअर्स वाढले असतील….असेच पुढे जात राहा “.. मात्र, काही वेळाने पोलार्डने ट्विट डिलीट केले.

आता पोलार्डने आकाश चोप्राला टॅग करताना हे ट्विट का केले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण, आयपीएल २०२२ मध्ये पोलार्डच्या खराब कामगिरीबद्दल चोप्राच्या टीकेशी त्याचा संबंध असू शकतो. वास्तविक, आकाशने पोलार्डच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीवर एक नव्हे तर अनेक प्रसंगी प्रश्न उपस्थित केले होते.

पोलार्डने आयपीएलच्या १५ व्या मोसमात १०७ च्या स्ट्राईक रेटने १४४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर संपूर्ण मोसमात त्याला केवळ ४ विकेट घेता आल्या. त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर चोपड़ाने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते, “मुंबई संघासोबत पोलार्डचा हा शेवटचा हंगाम असू शकतो.

मला वाटते की मुंबई इंडियन्स पोलार्डला सोडेल. ते मुरुगन अश्विन देखील सोडू शकतात. मला जयदेव उनाडकट बद्दल खात्री नाही, पण ते निश्चितपणे टायमल मिल्सला अलविदा म्हणू शकतात. यापूर्वी आकाशने पोलार्डची आयपीएल २०२२ मध्ये खराब कामगिरी करूनही त्याला वारंवार संधी दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

मग तो म्हणाला, “कायरन पोलार्डला वगळले पाहिजे आणि डेवाल्ड ब्रेव्हिसला त्याची जागा दिली पाहिजे.” पोलार्डला धावा करता आल्या नाहीत. त्याची गोलंदाजी मुंबई इंडियन्ससाठी उपयुक्त ठरू शकते. पण, पोलार्डला केवळ गोलंदाजीसाठी संघात ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलार्डला बाय-बाय म्हणण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.”

महत्वाच्या बातम्या
देशातल्या ब्राम्हणवादी लोकांनी कब्जा केलेल्या दलितांच्या जमिनी माघारी घ्या; दलित पँथरची मागणी
दीपक चाहरच्या पत्नीची पतीसाठी प्रेमळ पोस्ट, म्हणाली, त्यानं माझं ह्रदय चोरलं म्हणून…
फडणवीसांनी धुडकावली महाविकास आघाडीची ऑफर; उलटे फासे टाकत खेळला ‘हा’ डाव
…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now