आई माझी काळूबाई या मालिकेला वेगळे वळण; ‘ही’ अभिनेत्री सोडणार मालिका

सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याच सेटवर कोरोनाही पसरला होता. त्यामुळे जेष्ठ अभिनेत्री आशालता यांचे निधन झाले. पण आता आणखी एक मोठा बदल मालिकेत होतो आहे. या मालिकेत आर्या साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडला निर्मात्या अलका कुबल यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्याचे कारणही तसचे आहे.

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतल्या आर्या या मुख्य भूमिकेसाठी प्राजक्ताची निवड झाली. पण तीन महिने उलटताच प्राजक्ताच्या वर्तणुकीचा फटका मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना बसू लागला. ही मालिका आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार होणाऱ्या वादामुळे ती मालिका सोडणार आहे.

मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल म्हणाल्या, “गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण युनिट सातत्याने तिच्या ( प्राजक्ता गायकवाड) आडमुठ्या वागण्याला सहन करत होते. आजवर तिच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. तिच्या खोलीत गेल्यानंतर चार-चार तास बाहेर न येणे. सीन लागून सर्व कलाकार तयार असूनही सर्वांना वाट बघायला लावणे आणि चित्रीकरणासाठी तारीख देऊनही बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे. वारंवार हे प्रकार होऊ लागल्यामुळे चित्रीकरणाचे नियोजन गडबडून जायचे.”

तसेच “सेटवर अनेक कलाकार आहेत. यापैकी कुणालाही तुम्ही याबद्दल विचारु शकता. सेटवरच्याच एक ज्येष्ठ कलाकारानेही मला तिच्याबद्दल सुरुवातीला ताकीद दिली होती, तरीही मी तिच्यावर विश्वास दाखवला पण तिने आपल्या वर्तनाने सगळ्यांनाच निराश केले.”

आर्याच्या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे. यापूर्वी ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत होती. मात्र प्राजक्ताच्या वर्तणुकीचा फटका मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना बसू लागला. म्हणुन त्यांनी प्राजक्ताला घरचा रस्ता दाखवला. वीणा जगतापने ‘राधा प्रेम रंगी रंगली’, मराठी बिग बॉस मध्ये काम केले आहे.य

उलट प्राजक्ता गायकवाडने सांगितले की, मालिकेचे चित्रीकरण साताऱ्याला असते. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची तक्रार कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसेच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितले होते. पण, ‘आपण चित्रीकरण करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही’ असे मला सांगण्यात आले. मी परीक्षा देऊ शकले नाही. या सगळ्या वातावरणात काम करणे शक्य नसल्याचे सांगून मी मालिका सोडली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.