‘आई कुठ काय करते’ मालिकेतील यश खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

स्टार प्रवाहवरील अत्यंत कमी काळात प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे ‘आई कुठ काय करते’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यातूनही  या मालिकेत अरुंधती व अनिरुद्ध यांचे पात्र देखील प्रचंड गाजत आहे. मालिका सध्या एक नवीन वळण येऊ लागल आहे.

या मालिकेत प्रामुख्याने एका सर्व सामान्य आई या पत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. याप्रमाणे प्रत्येक घरातील आई आपल्या मुलांना घेऊन, त्यांच्या आयुष्याविषयी तसेच सासू-सासऱ्या प्रती आपुलकी या सर्व प्रत्येक गोष्टी अगदी हुबेहूब रेखाटल्या आहेत. त्यामुळे ही मालिका प्रत्येक स्त्रीच्या मना-मनापर्यंत जाऊन पोहचली.

तसेच या मालिकेतील पात्र अनिरुद्ध हा वाहवत जाऊन विवाहबाह्य सबंध ठेवत आहे. आपल्याला मोठी तीन मुलं असल्याचे देखील तो विसरून जातो आणि ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडतो. परंतु सध्या तो अरुंधतीचे सगळ्यांप्रती आपुलकी आणि कर्तव्य पाहून अनिरुद्ध आता त्यांच्या घरी राहायला आला आहे, आणि केलेल्या गोष्टींचा पश्चाताप त्याला होऊ लागला आहे.

या मालिकेतील मुलांमधील समजदार पात्र म्हणून यशची ओळख होते. सतत आईच्या पाठीशी उभा राहणारा यश नक्की आहे तरी कोण जाणून घेऊ. यश ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव अभिषेक देशमुख असे आहे. अभिषेक देशमुख याने याआधी ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत काम केलेले आहे. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती.

यश म्हणजे अभिषेक देशमुखने  ‘स्वीट होम’ या चित्रपटातही काम केले होते. तसेच अभिषेक देशमुख याने माधुरी दीक्षित हिने निर्मित केलेल्या ‘१५ ऑगस्ट’ या चित्रपटात काम केले होते. तसेच त्याने काही वेब सिरीज मध्ये देखील काम केले होते.

अभिषेकचे ६ जानेवारी २०१८ ला लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव कृतिका देव असे आहे. कृतिका ही देखील अभिनेत्री आहे.कृतिका हिने राजवाडे अँड सन्स आणि हॅपी जर्नी या चित्रपटात तिने काम केले. तसेच प्रथमेश परब सोबत तिने प्रेम दे या सीरिजमध्ये देखील काम केले होते. हे दोघेही पती-पत्नी सोशल मिडीयावर सक्रीय असतात.

हे ही वाचा-

नंदीग्राममधल्या पराभवावर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

भाऊ तुषार कपूरला अटक करण्यासाठी एकता कपूरने बोलवले पोलीस; जाणून घ्या पुर्ण किस्सा

तस्मानियन डेविल: विलुप्त झालेला सर्वात खतरनाक प्राणी, ३ हजार वर्षांनंतर दिसून आला जंगलात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.