‘अग्ग बाई सासूबाई’ मालिकेतील बबड्याच्या आजोबांचे निधन

मुंबई – ‘अग्ग बाई सासूबाई’ फेम जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारा दरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. रवी पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३४ ला झाला. त्यांनी १५० हुन अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तर २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या भुमिका निभावल्या आहेत.

अपराध मीच केला, अनंत, आरण्य, एकच प्याला, जबरदस्त प्रेम कहाणी ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. अंकुश, अशा असाव्या सुना, उंबरठा, तेजाब, नरसिंह, तक्ष ही त्यांचे प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट आहेत. त्यांचा अभिनय अतिशय प्रभावशाली होता.

अग्ग बाई सासूबाई, आमची माती, लाल गुलाबाची भेट, आमची माणसं ह्या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. उत्तम अभिनय आणि भारदस्त आवाजामूळे त्यांनी अनेक भुमिका गाजवल्या. एकाच प्रकारच्या भुमिका न करता त्यांनी अभिनयात वैविध्य ठेवले.

त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये राज्य केले आहे. ते सध्या झी मराठीवरील ‘अग्ग बाई सासूबाई’ मालिकेत काम करत होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दिलजीत आला शेतकऱ्यांसाठी धावून; एक कोटींची मदत करत केंद्र सरकारला केली ही विनंती

‘फुलपाखरू’ मालिकेतील वैदही आठवते का? आज दिसते अशी

‘कारभारी लयभारी’ मालिकेत कारभारीची भुमिका निभवणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला तुम्ही पाहिले नाही? पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.