Share

ऋताच्या लग्नात ऑनस्क्रिन जोडीदारच होता गैरहजर, स्वत: ऋतानेच याबाबत केला मोठा खुलासा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा विवाह प्रियकर प्रतिक शहासोबत झाला आहे. या विवाह सोहळ्याला अनेक कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या विवाह सोहळ्याला अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा ऑनस्क्रीन जोडीदार इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत उपस्थित नव्हता.(aaditya raut missing on ruta wedding)

यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पण आता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) या विवाह सोहळ्याला का हजर नव्हता यामागचे नेमके कारण समोर आले आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान अजिंक्य राऊत परभणीला गेला असल्याची माहिती मिळाली आहे. अजिंक्य राऊतच्या परभणी दौऱ्यामागे एक खास कारण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे ला अजिंक्य राऊतच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे अजिंक्य राऊत १७ मे ला त्याच्या घरी परभणीला गेला होता. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांचा विवाह सोहळा १८ तारखेला होता. त्यामुळे अजिंक्य राऊतला अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही.

याबद्दल बोलताना अजिंक्य राऊत म्हणाला की, “तू नेहमीच शूटिंगमध्ये बिझी असतोस. पण अशा गोष्टींसाठी तू वेळ काढायला हवा, असे माझ्या बहिणीने मला सांगितले. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस चुकवू नकोस, असे माझ्या बहिणीने मला सांगितले होते. ही गोष्ट माझ्या मनात राहिली होती. अखेर मी परभणीला जाण्यासाठी प्लॅन केला”, असे अजिंक्य राऊतने सांगितले.

“ऋता दुर्गुळेचे लग्न १८ तारखेला होते आणि आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस १७ तारखेला होता. त्यामुळे मी ठरवून देखील १८ तारखेला ऋताच्या लग्नाला मुंबईला पोहचू शकलो नसतो. मी ऋताला देखील याबद्दल सांगितले. त्यावर तिने मला घरीच थांबण्याचा सल्ला दिला”, असे अभिनेते अजिंक्य राऊतने सांगितले.

पण ऋताच्या सासूने म्हणजेच मुग्धा शाह यांनी अजिंक्यला चांगलेच खडसावले आहे. “ऋताच्या लग्नाला आला नाहीस, आता आम्हाला ओळख दाखवायची नाही”, असे मुग्धा शाह यांनी अजिंक्यला सांगितले आहे. अभिनेते अजिंक्य राऊतने अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांच्या साखरपुडा सोहळ्याला डान्स केला होता.

अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळेयांच्यात चांगली मैत्री आहे. अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या जोडीला देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अरे पण तू आहेस कोण?’ औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
प्रचंड सेक्स ऍडिक्ट झाला होता ऑस्करविजेता अभिनेता, गर्लफ्रेंडला तृप्त करण्यासाठी केली होती हद्द पार
मातोश्री बंगला काय मशीद आहे का? राज ठाकरेंनी शेलक्या शब्दांत राणा दाम्पत्याला झापले

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now