घर बसल्या आपण आधार कार्ड लॉक करू शकता; त्यासाठी पाठवावा लागेल ‘हा’ एसएमएस

आजच्या घडीला आधार कार्ड अतिशय महत्वाचे समजले जाते. आपण कुठेही गेलो तर स्वतःची ओळख किंवा पुरावा म्हणून आपल्याकडे आधार कार्ड मागितले जाते. बँकेचे पण व्यवहार आधार कार्डला लिंक केलेले असतात.

आपली ओळख आधार कार्डवर असलेल्या १२ आकडी नंबरही जोडलेली असते. पण त्याच आधारकार्डवरील आपली माहिती जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली तर त्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला जर आपला वैयक्तिक डेटा लीक होण्याची भीती असेल तर आपण आधार कार्ड लॉक करू शकतो.

जर चुकून कोणाचे आधार कार्ड हरवले आणि ते जर कोणाला सापडले तर त्याचा दुरुपयोग पण मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आधार कार्डचा दुरुपयोग करून आपल्या बँक खात्यातील पैसे पण काढून घेतले जाऊ शकतात.

आपण आपले आधार कार्ड लॉक करू शकता. त्यासाठी आपल्याला आपण आधार कार्डला जोडलेल्या नंबरवरून एक जीईटीओटीपी एसएमएस पाठवावा लागेल. ते केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर १९४७ क्रमांकावर आधार कार्ड नंबर पाठवून द्यावा लागेल.

यानंतर आपले आधार कार्ड लॉक होईल. आपल्या परवानगीशिवाय कोणालाही आपली माहिती पाहता येणार नाही. आपल्याला आपले आधार कार्ड अनलॉक पण करता येणार आहे. आपण आधार कार्ड लॉक केल्यानंतर जी पद्धत वापरली होती तीच पद्धत अनलॉक करताना पण वापरावी लागणार आहे.

सरकारने आधार कार्डच्या सुविधा पण ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. भाडेकरूंना पण आता ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवरील पत्ता बदलता येणार आहे. भाडेकरू भाडे कराराची पीडीएफ प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सबमिट करुन पत्ता बदलू शकतात.

ताज्या बातम्या
कोवीशील्ड लसीमधील अंतर सरकारने आणखीन वाढवले; जाणून घ्या यामागचं खरं कारण
ह्रदयद्रावक… ऑक्सिजन बेडवर ‘Love U जिंदगी’ गाणं ऐकत थिरकणाऱ्या ब्रेव्ह गर्लचा मृत्यू

आधी सगळी संपत्ती नावावर करा तरच मी किडणी देईल; कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा दवाखान्यातच रूद्रावतार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.