लस घेण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी करावे लागणार लिंक; वाचा सरकारचे आदेश 

मुंबई | मोठ्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहीमेला अखेर सुरुवात झाली आहे. तुम्हालाही जर लस घ्यायची असेल तर सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. लसीकरणासाठी SMS पाठविण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारने राज्यांना लोकांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी जोडण्यास सांगितले आहे.

आपल्या लसीकरणासाठी आधारकार्ड असणे खूप महत्वाचे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘जर तुम्हाला पहिला डोस आणि दुसरा डोस या दोन्ही लशी घ्यायच्या असतील तर प्रथम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा लागेल. तसेच, ‘लस कशी, कधी आणि कोणती देण्यात आली ही माहिती डिजिटल रेकॉर्ड करण्यासाठी आधार गरजेचे आहे’.

याबाबत केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे की, ‘लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा, जेणेकरून लसीकरणासाठी एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल. तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहणार आहे. आम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील रजिस्टर करु शकतो पण याठिकाणी आधार कार्डचा पर्याय सर्वात अचूक ठरणारा आहे.’

‘या’ कारणामुळे भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक…
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात आतापर्यंत आठ लाख सहा हजार लोकांना लसी देण्यात आली आहे. जरी काही ठिकाणी लसीचे काही दुष्परिणाम देखील पाहिले गेले आहेत, जे अत्यंत सामान्य आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे.

पुढे बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणतात, ‘लसीकरण हे करोनाच्या लढाईत शेवटचा योग्य पर्याय ठरणार आहे. हे दुर्दैव आहे की काही लोक राजकीय कारणांमुळे लसीबद्दल चुकीची माहिती पसरवित आहेत. यामुळे लोकांच्या एका छोट्या गटाला या लसीबाबत संकोच वाटतो.’

महत्त्वाच्या बातम्या
‘नोटेवरील गांधींचा फोटो बदलून शिवाजी महाराजांचा लावावा’
….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’
शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.