व्हा अधिक स्मार्ट! मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई | आजच्या काळात आधार कार्ड खूप गरजेचे आहे. आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत यासाठी प्रत्येक माणसाकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. याचबरोबर आपल्याला नवीन सिम कार्ड घेण्यापासून ते बँकेत आपले अकाऊंट उघडण्यापर्यंत सगळीकडे आधारकार्डची गरज असते.

यामुळे आपल्याला सतत आधारकार्ड जवळ बाळगायची गरज असते. मात्र आता ही हार्डकॉपी जवळ बाळगण्याची गरज नाही. कारण डिजिटलायझेशनमुळे अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आधारकार्डाचा सर्व तपशील तुमच्या स्मार्टफोनवर सहज उपलब्ध होऊ शकतो.

डिजिटल इंडियाला प्राधान्य देण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये एम-आधार अॅप लाॅन्च केले. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर युझर्सला पेपर फाॅरमॅटमधील आधारकार्ड बाळगण्याची गरज नाही. हे अॅप युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने तयार केले आहे.

गुगल प्ले स्टोअरवरुन हे एम आधार अॅप युझर्स डाऊनलोड करु शकतात. याचबरोबर तुम्हाला जर हे अॅप वापरायचे असल्यास रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. जर क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर युझर्सने जवळील आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊन तो रजिस्टर्ड करावा.

या सिस्टीमव्दारे आॅटोमॅटीकली टेम्परेरी पासवर्ड जनरेट होईल. या अॅपच्या माध्यमातून युझर्स आपली माहिती अपडेट करु शकतील. हे अॅप वापरल्यास युझर्सला आधारकार्डाची हार्डकापी जवळ बाळगण्याची गरज राहणार नाही. खासगी डेटा सुरक्षित राहवा यासाठी या अॅपमध्ये बायोमेट्रीक लाॅकिंग आणि अनलाॅकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’
नाथाभाऊंनी भाजपाला पाडले खिंडार! ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.