आदर पुनावालानंतर वडील सायरसही गेले लंडनला, पण वेगळेच कारण आले समोर; जाणून घ्या खरं काय..

जगभरात कोरोनावर प्रथमतः दोनच लस आल्या होत्या. त्यातील एक लस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी बनवली होती. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला हे लंडमला मागच्या आठवड्यात निघून गेले होते.

सायरस पुनावाला हे सीरम इंस्टीट्यूट समूहाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांच्यासोबतच त्यांचे वडिल पण कुटुंबासोबत लंडनला गेले आहेत. सायरस पुनावाला यांनी कुटुंबासोबत लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला याबद्दल वेग वेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सायरस पुनावाला यांनी मात्र ह्या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी युरोपात लस कंपनी उभे करण्याचे ठरविले असल्याचे म्हटले आहे. सायरस पुनावाला यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली आहे.

सायरस पुनावाला यांनी म्हटले आहे की, मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येत असतो. त्यामुळे जी लोक म्हणत आहेत की मी आणि माझ्या उलने देश सोडला आहे हे अगदी खोटे आणि मूर्खपणाचे आहे.

त्यांनी पुढे सांगितले आहे की ते दरवर्षी उन्हाळ्यात लंडनला जात असतात. लहानपणापासून आदर पण लंडनला येत असतात. त्यामुळे मी किंवा माझ्या कुटुंबाने लंडनला येणे त्यात नवे असे काही नाही.

पुण्यामधील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी कोरोनावर प्रतिबंध म्हणून कोविशील्ड ही लास उत्पादित करत आहे. त्यामुळे आता देशाचे बऱ्यापैकी लसीकरण करण्याची जबाबदारी आदर पुनावाला यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढत असल्याचे पण त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

ताज्या बातम्या
‘तुम्हाला मी सोडणार नाही’; ‘त्या’ प्रेक्षकांना सलमान खानने दिली कायदेशीर कारवाईची धमकी

शाब्बास पठ्ठ्या! गावाकडच्या मेकॅनिकने लावलाय भन्नाट शोध; १ लीटरमध्ये गाडी देते १५० किलोमीटर ॲव्हरेज

मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला; सातवांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंची रडवणारी पोस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.